इंटरनॅशनल क्रिकेट समिती ( आयसीसी) तर्फे आयोजित पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जून पासून साऊथॅम्प्टनवर खेळला जाईल. तिथे भारतीय संघ आपला पहिल्या कसोटी किताब जिंकण्याकरिता न्युझीलंड विरुद्ध दोन हात करील. या अंतिम सामन्यासाठी 10 दिवसांचा अवकाश असून विश्वक्रिकेटचे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट बघत आहेत. दुसऱ्या बाजूला बरेच दिग्गज खेळाडू या अंतिम सामन्याविषयी आपली मत मांडत आहे.
अधिकतर माजी खेळाडूंनी या अंतिम सामन्यासाठी न्युझीलंड संघाला पसंती दिली आहे, कारण न्युझीलंड सध्या 2 सामन्यांची मालिका इंग्लंडविरुद्ध खेळत असून या मालिकेचा त्यांना फायदा होईल आणि भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागेल असे मत मांडले आहे. परंतु वेस्टइंडिजचे माजी खेळाडू आणि दिग्गज गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी भारतीय संघाला पसंती दिली असून , भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानले आहे.
मायकल होल्डिंग यांनी भारतीय गोंलंदाजी आक्रमणाची प्रशंसा करताना सांगितले की इंग्लडंमधील परिस्थिती पाहता विराटसेना आनंदित असेल मग ते वेगवान गोलंदाज असोत किंवा फिरकीपटू. होल्डिंगचे मत आहे की विश्वकसोटी स्पर्धा भारताला जिंकून देण्यात फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचं मोठं योगदान राहील. त्यांनी पुढे सांगितले की जर परिस्थितीमुळे भारतीय संघाला फक्त एक फिरकीपटूला अंतिम एकादशमध्ये संधी द्यावी लागली तर भारतीय संघ रवीचंद्रन अश्विनसोबत मैदानात उतरेल.
त्यांनी पुढे सांगितले की, “यात काहीच दुमत नाही की अंतिम सामन्यात एकूण ‘वातावरण महत्वाची भूमिका निभावनार आहे. परंतु भारतीय संघाकडे ज्या प्रकारचे गोलंदाजी आक्रमण आहे, त्याला कुठल्याही परिस्थितीत मदत मिळू शकते मग ते ऊन असो की ढगाळ वातावरण. जर वातावरण साफ असेल तर भारतीय संघ 2 फिरकी गोलंदाजांसोबत उतरेल किंवा मग एकाला संधी द्यायची ठरली तर ते अश्विनवर विश्वास दाखवतील.”
मायकल होल्डिंग यांनी पुढे सांगितले की साऊथॅम्प्टनची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक आहे, त्यामुळे ही बाब अंतिम सामन्यात भारताच्या संघाच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे. होल्डिंग यांनी भारतीय फलंदाजी ही न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीपेक्षा अधिक खोलवर आणि मजबूत सांगितले आहे
महत्त्वाच्या बातम्या –
विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत एकाच डावात सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
जेम्स अँडरसननही अडचणीत! ब्रॉडला ‘लेस्बियन’ संबोधलेले ट्विट होतंय व्हायरल