अहमदाबाद। इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. भारत आणि इंग्लंड संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचे दोन सामने पुर्नबांधणी केलेल्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) होणार आहे. तसेच या कसोटी मालिकेनंतर होणारी ५ सामन्यांची टी२० मालिकाही याच स्टेडियमवर होणार आहे.
या स्टेडियमवर १९८४ साली पहिला वनडे सामना झाला होता. तसेच इथे १२ कसोटी, २३ वनडे आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना झाला आहे. पण २०१५ सालापासून जून्या मोटेरा स्टेडियमची पुर्नबांधणी करण्यास सुरुवात करण्यात आली. मागीलवर्षी हे स्टेडियम पूर्णपणे तयार झाले आणि आता हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरले आहे.
आता या पुर्नबांधणी केलेल्या स्टेडियमवर भारत-इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. या पुर्नबांधणी केलेल्या स्टेडियमची १ लाख १० हजार आसन क्षमता आहे.
तसेच हे स्टेडियम भारतात होणाऱ्या दुसऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याचेही साक्षीदार होणार आहे. कारण भारत-इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.
खरंतर हे मोटेरा स्टेडियम अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. जुन्या मोटेरा स्टेडियमवर (पुर्नबांधणी करण्याआधीच्या मोटेरा स्टेडियमवर) काही विश्वविक्रम रचले गेले आहेत. हे स्टेडियम काही ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असून त्याचा आपण आढावा घेऊ.
या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे मोटेरा स्टेडियम
– भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी १९८७ साली पाकिस्तानविरुद्ध या स्टेडियमवर सामना खेळताना १०,००० कसोटी धावांचा टप्पा पार केला होता. त्यावेळी कसोटीमध्ये १०,००० धावांचा टप्पा पार करणारे ते पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यावेळी प्रेक्षकांनी गावसकरांच्या यशाचा इतका आनंद साजरा केला होता, की सामना २० मिनिटे थांबवावा लागला होता.
#OnThisDay in 1987, India legend Sunil Gavaskar became the first player to score 10,000 Test runs!
He reached the milestone in his 124th Test, against Pakistan in Ahmedabad. Play was stopped for over 20 minutes while the crowd went wild for his achievement! pic.twitter.com/2S0mEjS0At
— ICC (@ICC) March 7, 2019
– कपिल देव यांनी १९९४ मध्ये मोटेरा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळताना सर रिचर्ड्स हेडली यांचा सर्वाधिक ४३१ कसोटी विकेट्सचा विक्रम मोडला होता आणि ते कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज ठरले होते.
– या स्टेडियमवर १९९९ साली सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध खेळताना कारकिर्दीतील पहिले कसोटी द्विशतक केले होते. त्याने न्यूझीलंड विरुद्ध २१७ धावांची खेळी केली होती.
– विश्वचषक २०११ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताचा उपांत्यपूर्व सामना याच स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात सचिनने वनडेमध्ये १८००० धावांचा टप्पा पार केला होता. तो हा टप्पा पार करणारा पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू ठरला होता. याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत त्यांचे सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नाला सुरुंग लावला होता. त्यावेळी २६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताला युवराज सिंग (५७*) आणि सुरेश रैनाने(३४*) नाबाद ७४ धावांची भागीदारी केली होती.
#OnThisDay in 2011, Yuvraj Singh's unbeaten half-century knocked Australia out of the @cricketworldcup, ending their streak of three successive World Cup wins pic.twitter.com/H3ZPwsGQOT
— ICC (@ICC) March 24, 2018
– साल १९९६ ला याच मैदानात भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण ५१ धावा केल्या होत्या. तसेच अनिल कुंबळेसह (३०) ५६ धावांची भागीदारीही केली होती. हा सामना भारताने ६४ धावांनी जिंकला होता.
मोटेरा स्टेडियमवर १०० वा कसोटी सामना खेळण्याची इशांत शर्माला संधी –
नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा भारत आणि इंग्लंड संघातील तिसरा कसोटी सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी १०० वा कसोटी सामना ठरु शकतो. त्याला जर या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली तर तो इशांतचा कारकिर्दीतील १०० वा सामना असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
शंभराव्या कसोटीच्या उंबरठ्यावर असलेला इशांत शर्मा म्हणाला, ‘…तर मी शंभर कसोटी खेळू शकलो नसतो’
“धोनीच्या नेतृत्वात खेळणे म्हणजे स्वप्नपूर्ती”, सीएसकेत निवड झालेल्या क्रिकेटपटूने दिली प्रतिक्रिया