भारताचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सध्या काउंटी क्रिकेटमध्ये केंट संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सैनीने काउंटी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्याने जबरदस्त प्रदर्शन कले आणि केंट संघाला १७७ धावांनी विजय मिळवून दिला. वारविकशायर संघाविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या.
केंट संघाला विजय मिळवून देण्यासाठी नवदीप सैनी (Navdeep Saini) याचे प्रदर्शन सर्वात महत्वाचे ठरले. याच कारणास्तव त्याला सामना संपल्यानंतर सामनावीर पुरस्कार दिला गेला. सामनावीर ठरल्यानतंर त्याने मोठी प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर केंट क्रिकेटसोबत बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.
तो म्हणाला की, “मी लीस्टरमध्ये वॉर्म-अप सामना खेळत होतो. तो सामना खेळल्यानंतर मी काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. मला इथे खूप काही शिकण्याची संधी मिळत आहे आणि माझी गोलंदाजी दिवसेंदिवस अधिकच सुधारत चालली आहे. इथे वातावरणात खूप बदल होताना दिसतो. कधी सूर्यप्रकाश पडतो, तर कधी ढगाळ वातावरण असते.”
🗣 Edgbaston mein @navdeepsaini96 aur @nikkichaudhuri ke beech post-match interview:
Aapne upne Kent ke debut match mein 5+ wickets ke saath khaata khola hain – iss achievement ke baare mein aap kya kahana chahoge? pic.twitter.com/cgq0lHFrW2
— Kent Spitfires (@KentCricket) July 23, 2022