सध्या संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही भारतातील कोरोनाची दुसरी लाट असल्याचे म्हटले जात आहे. दररोज लक्षावधी लोकांना या आजाराची लागण होतेय. देशभरातील परिस्थिती गंभीर असली तरी जगातील सर्वात प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग असलेल्या आयपीएलचा १४ वा हंगाम हा सुरु आहे. अशा परिस्थितीत काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी आता आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंविषयी देखील महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे.
न्यूझीलंडच्या खेळाडूंचा मोठा निर्णय
सध्या आयपीएलमध्ये विविध संघांत न्यूझीलंडचे प्रमुख क्रिकेटपटू खेळत आहेत. यामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनसह ट्रेंट बोल्ट, ऍडम मिल्ने, फिन ऍलन, लॉकी फर्गुसन, मिचेल सॅंटनर, कायले जेमिसन, जिमी निशाम व टीम सिफर्ट हे खेळाडू तर, कायले मिल्स, ब्रेंडन मॅक्युलम, माईक हेसन हे प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. हे सर्व खेळाडू कोरोनाचे संकट वाढत असतानाही आयपीएलमध्ये खेळत राहतील, असे न्यूझीलंड क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष हेथ मिल्स यांनी स्पष्ट केले आहे.
मिल्स यांनी म्हटले, “खेळाडूंना परत बोलावण्याचा काही निर्णय झाला नाही. सर्व खेळाडू स्पर्धेसाठीच्या बायो-बबलमध्ये सुरक्षित आहेत. खेळाडूंना अधिक प्रवास करावा लागत नाही आणि ते राहत असलेली हॉटेल्स केवळ त्यांच्यासाठीच असल्याने खेळाडूंना धोका नाही.” न्यूझीलंडच्या खेळाडूंना आयपीएलनंतर थेट इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी खास विमानाने इंग्लंड ला पोहोचवण्यात येईल.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्पर्धेतून घेतली माघार
भारत सरकारने मंगळवारी दिलेला ताज्या आकडेवारीनुसार, ३ लाख २३ हजार १४४ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर, २,७२१ लोकांचा मृत्यू झाला. ही भीषण परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ऍण्ड्रू टाय, केन रिचर्डसन व ऍडम झम्पाने स्पर्धेच्या मध्यातून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तसेच, ऑस्ट्रेलियन सरकारच्या नव्या नियमामुळे उर्वरित खेळाडू देखील कधीही मायदेशी जाण्यासाठी रवाना होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या:
कोरोना लसीकरणाबाबत बीसीसीआयची दुटप्पी भूमिका, भारतीयांना लस देणार तर परदेशी खेळाडू
मोठी बातमी! टी नटराजनच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
कोरोनामुळे आयपीएल फ्रँचयाझींचे इतक्या कोटींचे नुकसान, प्रिती झिंटाच्या पंजाबला सर्वात मोठा फटका!