शारजाह येथे सध्या सुरु असलेल्या अफगाणिस्तान प्रिमिअर लीग(एपीएल) या स्पर्धेत रविवारी काबुल झ्वानन संघाच्या हजरतुल्ला झझाइने एकाच षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
त्यामुळे तो आता एकाच षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. याआधी अशी कामगिरी गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग आणि रॉस व्हिटली यांनी केली आहे.
या खेळाडूंपैकी फक्त युवराज सिंग आणि हर्षल गिब्स यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.
विशेष म्हणजे या दोघांनीही 2007 मध्ये हा विक्रम केला आहे. फक्त गिब्स यांनी वनडे विश्वचषकात तर युवराजने टी20 विश्वचषकात ही कामगिरी केली आहे.
तसेच इन्झमाम-उल-हक, अॅलेक्स हेल्स आणि रविंद्र जडेजा यांनीही सलग 6 चेंडूत 6 षटकार मारले आहेत. परंतू त्यांनी एकाच षटकात हा पराक्रम केलेला नाही.
झझाइ या स्पर्धेत काबुल झ्वानन या संघाकडून खेळत आहे. त्याने 6 चेंडूत 6 षटकार मारण्याची कामगिरी बाल्ख लिजन्ड्सविरुद्ध केली आहे. त्याने या सामन्यात बाल्ख लिजन्ड्सचा गोलंदाज अब्दुल्ला मझारीने टाकलेल्या तिसऱ्या षटकात हे 6 षटकार मारले.
याबरोबरच त्याने 12 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे त्याने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
त्याने या सामन्यात 17 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 62 धावांची खेळी केली. मात्र त्याची ही खेळी त्याच्या काबुल झ्वानन संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
एका षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारणारे खेळाडू-
1968 – गॅरी सोबर्स
1985 – रवी शास्त्री
2007 – हर्षल गिब्स
2007 – युवराज सिंग
2017 – रॉस व्हिटली
2018 – हजरतुल्ला झझाइ
6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣
Sobers v Nash, 1968
Shastri v Raj, 1985
Gibbs v van Bunge, 2007
Yuvraj v Broad, 2007
Whiteley v Carver, 2017
Zazai v Mazari, 2018Congratulations on joining the six sixes in an over club, @zazai_3! 💥 pic.twitter.com/vfYVKg7dE6
— ICC (@ICC) October 15, 2018
महत्वाच्या बातम्या-
–तूम्ही जर अजिंक्य रहाणे- पृथ्वी शाॅचे फॅन असाल तर ही आहे तूमच्यासाठी सर्वात मोठी बातमी
–त्यावेळी आम्ही पृथ्वी शॉच्या १० टक्केही आसपास नव्हतो – विराट कोहली