टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा संघ मुंबई इंडियन्स आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. आता रोहितनं जूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, रोहित शर्मानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. पोस्ट पाहता रोहितनं हे रागाच्या भरात लिहिल्याचं दिसतंय. वास्तविक, या पोस्टद्वारे रोहितनं आयपीएल ब्रॉडकास्टर चॅनलला फटकारलंय. विरोध करूनही चॅनलनं त्याचा वैयक्तिक व्हिडिओ प्ले केल्याचं रोहितनं म्हटलंय. तो म्हणतो की खेळाडूंचं वैयक्तिक आयुष्यही असतं. ते मित्रांशी बोलतात, प्रवास करतात, कुटुंबासोबत असतात. प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करून परत प्ले करणं योग्य नाही.
रोहितनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “क्रिकेटपटूंच्या आयुष्यात खूप लुडबूड चालू आहे. कॅमेरे आमची प्रत्येक हालचाल आणि संभाषण रेकॉर्ड करत आहेत. आम्ही आमच्या मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत, प्रशिक्षणादरम्यान आणि सामन्याच्या दिवशी खाजगीत काय करतो हे सर्व रेकॉर्ड केलं जात आहे”.
हिटमॅननं पुढे लिहिलं की, “मी स्टार स्पोर्ट्सला संभाषण रेकॉर्ड न करण्यास सांगितलं होतं, तरीही त्यांनी ते केलं आणि प्रसारितही केलं. हे माझ्या गोपनीयतेचं उल्लंघन आहे. अशा गोष्टींमुळे एक दिवस चाहते, क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील विश्वास कमी होईल.”
The lives of cricketers have become so intrusive that cameras are now recording every step and conversation we are having in privacy with our friends and colleagues, at training or on match days.
Despite asking Star Sports to not record my conversation, it was and was also then…
— Rohit Sharma (@ImRo45) May 19, 2024
वास्तविक, आयपीएल दरम्यान रोहितचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे हिटमॅन संतापलेला दिसतोय. असाच एक व्हिडिओ ब्रॉडकास्टर चॅनलनं प्ले केला होता, ज्यामध्ये रोहित मुंबई संघाचा माजी खेळाडू धवल कुलकर्णी आणि इतरांसोबत बोलत होता. त्यानंतर रोहितनं कॅमेरामनला रेकॉर्डिंग न करण्यास सांगितलं होतं. व्हिडिओमध्ये रोहित स्वतः म्हणत होता की, “भाऊ, ऑडिओ बंद करा. एका ऑडिओनं माझी वाट लावली आहे.”
कदाचित रोहित त्या व्हिडिओबद्दलही बोलत असेल, ज्यामध्ये तो कोलकाता नाइट रायडर्स संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी बोलत होता. हा व्हिडिओ चॅनलवर चालला आणि चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून, रोहित आता पुढच्या हंगामात केकेआरमध्ये सामील होऊ शकतो, असा अंदाज चाहत्यांनी लावला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयची 30 खेळाडूंवर करडी नजर, अय्यर-किशनबाबतही मोठा खुलासा; टीम इंडियात पुन्हा एंट्री मिळेल का?
आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरल्यानंतर विजय माल्ल्यांची प्रतिक्रिया व्हायरल, खास ट्विट करून म्हणाले…