चालू वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे माजी खेळडू संजय मांजरेकरांना वाटते की, ऑस्ट्रेलियामध्ये फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलसाठी अनुकूल खेळपट्टी नाहीये. याच कारणास्तव चाइनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला संघात सहभागी केले पाहिजे, असेही मांजरेकरांना वाटते.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरू असेलेल्या टी-२० मालिकेत सहभागी होता, पण मालिका सुरू होण्यापूर्वी दुखापतीमुळे त्याने माघार घेतली. दुसरीकडे युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्रभाव पाडू शकला नव्हता, पण तिसऱ्या सामन्यात त्याने घेतेलल्या तीन विकेट्समुळे भारताचा विजय सोपा झाला.
माध्यांमतील वृत्तानुसार आगामी टी-२० विश्वचषकाविषयी बोलताना संजय मांजरेकर (Sanjay Majarekar) म्हणाले की, “ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर त्यांची चाचणी घेतली जाईल. खेळपट्टी त्या पद्धतीची नसेल, जी चहलला आवडते. त्यामुळेच मला असे वाटते की, कुलदीप यादवला संघात सहभागी केले पाहिजे. त्याच्यासारख्या गोलंदाजासाठी बाउंस असेल. दुसरी गोष्ट ही की, विश्वचषकात तुम्ही प्रत्येक सामन्यात वेगळ्या संघासोबत खेळता. त्यामुळे असे संघ येतील, जे कुलदीप यादवसमोर चांगले प्रदर्शन करू शकणार नाहीत.”
मांजरेकरांच्या मते खेळपट्टीवर चेंडूला स्पिन मिळाला, तर चहल संघाची पहिली पसंती असेल. पण त्यांच्या मते सपाट आणि बाउंस असलेल्या खेळपट्टीवर चहलला गोलंदाजी करायला आवडणार नाही. परंतु चहलकडे त्याचा अनुभव आहे, ज्याच्या जोरावर तो विश्वचषकात चांगले प्रदर्शन करू शकतो.
“जर ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर स्पिन असेल, तर चहल तुमचा मुख्य गोलंदाज बनू शकतो. परंतु जसे की मी आधी म्हटलो, एक सपाट आणि बाउंस असेलली खेळपट्टी, अशी खेळपट्टी नाहीये, ज्यावर चहलला गोलंदाजी करायला आवडेल. पण त्याच्याकडे स्वतःला संघात सामील करण्यासाठी दुसरे कारण आहे,” असे मांजरेकर पुढे बोलताना म्हणाले.
दरम्यान, आयपीएल मागच्या वर्षी चहलने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करून देखील निवडकर्त्यांनी त्याला २०२१ टी२० विश्वचषकात संधी दिली नव्हती. अशात यावर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळण्यासाठी चहल पूर्ण प्रयत्न करत आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या असून पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी हा ‘पठ्ठ्या’ उत्तम पर्याय, भारताच्या माजी विश्वविजेत्या दिग्गजाची प्रतिक्रिया
भारतीय संघात पुनरागमनानंतर मोहम्मद शमी आणि चेतेश्वर पुजाराची भन्नाट प्रतिक्रिया
नेटमधला तो चेंडू राहुलला पडला भलताच महागात; उपचारासाठी जावे लागणार ‘या’ देशात