जगातिक कसोटी चॅम्पियनशिपचा पहिला-वहिला अंतिम सामना काहीच दिवसांवर राहिला आहे. भारतीय संघ हा सध्या इंग्लंडमध्ये सराव करत आहे. २०१९ मध्ये चालू झालेल्या या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा १८ जून ते २२ जून पर्यंत साऊथॅम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. अंतिम सामन्याआधी विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा आपल्या शिष्याबद्दल आणि भारतीयबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विराट कोहलीला एका विशिष्ट गोलंदाजाविरूद्ध सावध राहाण्याचा इशारा दिला आहे आणि सल्लाही दिली आहे.
अंतिम सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीने न्यूझीलंड गोलंदाज टीम साऊथी समोर सावध राहणे आवश्यक आहे, असे राजकुमार शर्मा यांचे मत आहे. हे सर्वांनाच ठाऊक आहे की विराट कोहलीची टीम साऊथी विरूद्ध फारशी चांगली कामगिरी नाही. ही आजची गोष्ट नाही, हा संघर्ष १९ वर्षांखालील स्तरापासून सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी आपल्या लाडक्या शिष्यास महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
कोहलीला माहित आहे की तो कुठे चुकत आहे
राजकुमार शर्मा यांनी इंडिया न्यूजला सांगितले की कोहलीला माहित आहे की तो टीम साऊथी विरूद्ध कुठे चुकत आहे, आता त्याला ही चूक सुधारण्याची गरज आहे.
ते म्हणाले, ‘विराट कोहली कोठे चूक करतो हे त्याला माहित नाही असे नाही, परंतु असे असूनही टीम साऊथीने त्याला १० वेळा बाद केले, ही बाब चिंताजनक आहे. विराट कोहलीला ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू सोडण्याची गरज आहे. टीम साऊथी सतत अशा लेंथवर गोलंदाजी करतो जिथे फलंदाजांना निर्णय घ्यावा लागतो हा चेंडू सोडू की खेळू, टीम साऊथी हा चांगल्या प्रकारे स्विंग गोलंदाजी करतो, त्याला जर मददगार खेळपट्टी मिळाली तर त्याला खेळणे हे अशक्य होऊन जाते.’
कसोटी चॅम्पियनशिपनंतर मिळेल विश्रांती
साल २०१९ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात झाली होती. भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे सर्वात महत्त्वाचे ठरले आहेत. दोघांनी ९-९ डावात १०० हून अधिक चेंडू खेळले आहेत. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मासुद्धा असे करू शकले नाहीत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपनंतर भारताला यजमान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकादेखील खेळायची आहे. अंतिम सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना सुमारे तीन आठवडे (२० दिवस) विश्रांती मिळेल आणि १४ जुलै रोजी नॉटिंघॅममध्ये इंग्लंडविरूद्ध ऑगस्टपासून सुरू होणार्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी सर्वे एकत्र येतील.
महत्वाच्या बातम्या
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी झाली पंचांची निवड, ‘हे’ असणार सामनाधिकारी
श्रीलंका क्रिकेटमधील वाद अंशतः शमला, ‘या’ अटींसह खेळाडू जाणार इंग्लंडला
‘या’ कारणामुळे कोहली ठरतो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज, राशिद खानने सांगितली खुबी