आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (14 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. आयसीसीने या संघामध्ये एकूण 12 खेळाडूंना जागा दिली आहे. यामध्ये 4 इंग्लंड तर 12वा खेळाडू मिळून भारताचे 3 जणांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या दोन खेळाडूंना जागा मिळाली तर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
आयसीसीने सलामीवीर म्हणून जोस बटलर (Jos Buttler) आणि ऍलेक्स हेल्स यांना निवडले, ज्यांनी इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. आयसीसीने निवडलेल्या संघाचाही कर्णधार बटलरच आहे. टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) आहे. ज्याने आठव्या टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या. त्याने 6 डावांमध्ये 4 अर्धशतकांच्या 296 धावा केल्या.
चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. त्याने काही विलक्षण खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली. पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आहे, त्याने एका शतकाच्या सहाय्याने या स्पर्धेत 201 धावा केल्या. झिम्बाब्वेचा सिकंदर रझा सहाव्या स्थानावर आहे. त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने चाहत्यांचे मन जिंकले. झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केले होते.
सातव्या क्रमांकावर पाकिस्तानचा शादाब खान आहे. त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही उत्तम प्रदर्शन केले. आठव्या क्रमांकावर इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन आहे, जो मालिकावीरही ठरला. 9व्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नोर्तजे, 10व्या स्थानावर इंग्लंडचाच मार्क वूड आणि 11व्या क्रमांकावर पाकिस्तानचाच शाहीन आफ्रिदी आहे. हार्दिक पंड्या बाराव्या क्रमांकावर आहे. Virat Kohli, Suryakumar Yadav named in ICC Men’s T20 World Cup Most Valuable Team
टी20 विश्वचषक 2022- टीम ऑफ द टुर्नामेंट
जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर) (इंग्लंड), ऍलेक्स हेल्स (इंग्लंड), विराट कोहली (भारत), सूर्यकुमार यादव (भारत), ग्लेन फिलिप्स (न्यूजीलंड), सिकंदर रझा (झिम्बाब्वे), शादाब खान (पाकिस्तान), सॅम करन (इंग्लंड), एनरिक नोर्त्जे (दक्षिण आफ्रिका), मार्क वूड (इंग्लंड), शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान).
12वा खेळाडू- हार्दिक पंड्या (भारत)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा
धोनी टॉपवर असलेल्या यादीत जोस बटलरने मिळवले स्थान, वयाच्या 32 व्या वर्षी बनला जगज्जेता कर्णधार