भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका ५ फेब्रूवारी पासून सुरू होत आहे. त्यानुसार दोन्हीही संघांनी सरावाला जोरदार सुरुवात केली आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनाने अतिशय महत्त्वाची आहे. अशातच इंग्लंड संघासाठी चिंतेची बातमी समोर येत आहे. इंग्लंड संघाकडून नुकतेच दुहेरी शतक झळकावणारा जॅक क्राउले दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे.
इंग्लंड संघाला बसू शकतो फटका
क्राउले मंगळवारी (२ फेब्रुवारी) ड्रेसिंग रूममध्ये उजव्या हातावर पडला. त्यामुळे त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आहे. याच कारणामुळे बुधवारी सराव सत्राला तो उपस्थित राहू शकला नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, स्कॅन रिपोर्ट्सनुसार क्राउले उजव्या हाताच्या मनगटावर पडल्याने त्याच्या हातावर सूज आली आहे. त्यामुळे पहिल्या २ कसोटी सामन्यातून त्याला बाहेर करण्यात आले आहे. इंग्लंड संघाची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे.”
जॅक क्राउलेची कमजोरी
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्या झालेल्या कसोटी मालिकेत क्राउलेने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन २६७ धावांची खेळी केली होती. परंतु नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर क्राउले फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला. त्याला २ कसोटी सामन्यात एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. भारतातील मैदाने फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहेत. तसेच भारतीय संघाकडे आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांसारखे फिरकी गोलंदाज आहेत.
जॅक क्राउले याची कसोटी कारकिर्द
जॅक क्राउले याने इंग्लंड संघासाठी १० कसोटी सामन्यातील १६ डावामध्ये ३८.५० च्या सरासरीने ६१६ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकाविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या जो रूटला खेळायचा आहे टी२० विश्वचषक, म्हणाला…
‘सेहवाग प्रमाणे पंतलाही घाबरतात मोठमोठे गोलंदाज’, इंग्लंडच्या दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
IND Vs ENG : चेन्नई कसोटीत ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन