पुणे। तिसऱ्या एसएनबीपी राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे बालेवाडी येतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी केल्हापुरच्या खेलो इंडिया सेंटर संघाचा एकमात्र गोलच्या जोरावर १-० असा पराभव केला.
दोन समान ताकदीच्या संघात झालेल्या लढतीत तुल्यबळ खेळ बघायला मिळाला. पूर्वार्धात शलानी शाकुरे हिने १८व्या मिनिटाला नोंदवलेला गोल निर्णायक ठरला.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात नाशिक अकादमी संघाने यजमान एसएनबीपी अकादमी संघाचा २-० असा पराभव केला. सामन्याच्या पहिल्या सत्रातच वैष्णवी भोईटे हिने दोन्ही गोल केले. पहिला गोल तिने सातव्या मिनिटाला आणि दुसरा गोल दहाव्या मिनिटाला केला. या पहिल्या सत्रातील गोलनंतर नाशिकने आघाडी अखेरपर्यंत कायम राहिल याची काळजी घेतली.
विजेत्या संघाला रोख ५० हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभ ऑलिंपियन डॉ. धनराज पिल्ले याच्या हस्ते पार पडला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वैशाली भोसले आणि संचालक ऍडव्होकेट ऋतुजा भोसले, स्पर्धा समन्वयक फिरोज शेख, संयोजन सचिव विभाकर तेलोरे उपस्थित होते.
निकाल –
महाराष्ट्र इलेव्हन १ ( शालिनी शाकुरे १८वे मिनिट) वि.वि. खेलो इंडिया सेंटर,कोल्हापूर ०, मध्यंतर – १-०
तिसऱ्या क्रमांकासाठी –
नाशिक अकादमी २ (वैष्णवी भोईटे ७, १०वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी अकादमी ० मंध्यतर – २-०
वैयक्तिक पारितोषिके –
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – सुष्मिता पाटील (खेलो इंडिया सेंटर, कोल्हापूर)
सर्वोत्कृष्ट बचावपटू – मानसी वाघमारे (एसएनबीपी अकादमी, पुणे)
सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक – साची गांगुर्डे (नाशिक अकादमी)
सर्वोत्कृष्ट आक्रमक – काजल आटपाटकर (महाराष्ट्र इलेव्हन)
स्पर्धेची मानकरी – मनश्री शेडगे (महाराष्ट्र इलेव्हन)