दक्षिण आफ्रिकाचे माजी दिग्गज फलंदाज जॉन्टी रोड्स जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत रोड्सने अनेक जबरदस्त झेल घेतले, जे आजही चाहत्यांच्या लक्षाच आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये भारताचा रविंद्र जडेजा याचे नाव आवर्जून घेतले जाते. स्वतः जॉन्टी रोड्सने यांच्यावर देखील जडेजाचे चांगलाच प्रभाव आहे.
जगात एकच सर्वोत्तम क्षेत्ररक्षक
माध्यमांशी बोलताना जॉन्टी रोड्स (Jonty Rhodes) यांना सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाविषयी प्रश्न विचारला गेला. यावर त्यांना रविंद्र जडेजा असे उत्तर दिले. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीव्यतिरिक्त जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. मैदानाती त्याची चपळाई पाहून आजपर्यंत अनेकदा दिग्गजांकडून त्याचे कौतुक झाले आहे. अडचणीच्या काळात अनेकदा भारतीय संघ जडेजाच्या चपळाईमुळे जिंकला आहे. “सध्या जगात एकच सर्वात्तम क्षेत्ररक्षक आहे तो आहे रविंद्र जडेजा,” असे जॉन्टी रोड्स यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी भारतीय दिग्गज प्रवीण आमरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी रविंद्र जडेजा याचे कौतुक केले होते. स्पोर्ट्सकीडासोबत चर्चा करताना ते म्हणाले होते की, “रविंद्र जडेजा आतापर्यंतचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे, ज्या मी खेळताना पाहिले. तो चेंडूचा अचूक अंदाच लावतो आणि जबरदस्त थ्रो करतो. त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकलून दिले आहेत. युवराज सिंग, सुरेश रैना आणि मोहम्मद कैफ हेदेखील जबरदस्त क्षेत्ररक्षक होते. पण जडेजा सर्वोत्तम आहे.”
दरम्यान, आगामी आयपीएल हंगामात जडेजाला खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता दिसत आहे. मागच्या वर्षी एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले होते आणि जडेजाला संघाचा नवीन कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले होते. पण हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सीएसकेने अतिशय सुमार प्रदर्शन केले. परिणामी जडेजाने स्वतःहून कर्णधारपदावरून पायउतार झाला. अशात धोनीला पुन्हा संघाची कमान आपल्या हाती घ्यावी लागली. यावर्षीही धोनीच सीएसकेचे नेतृत्व करताना दिसेल. असे असले तरी, धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. असात पुढच्या वर्षी सीएसकेचा कर्णधार पुन्हा जडेजाच होऊ शकतो. (According to Jonty Rhodes, Ravindra Jadeja is the best fielder in the world)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! सचिनचा लेक गाजवणार आयपीएल 2023? स्वतः रोहित म्हणाला…
मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीवर संकट! पहिल्या सामन्याला मुकणार ‘एवढे’ खेळाडू