भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक 2023 मध्ये अजुनपर्यंत अजिंक्य आहे. मागील सामन्यात संघाने शेजारील देश श्रीलंकेवर 302 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने अप्रतिम गोलंदाजी केली. गेल्या काही सामन्यांमध्ये सिराजची कामगिरी काही खास नव्हती आणि तो नव्या चेंडूवर भरपूर धावा देत होता. मात्र, संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला श्रीलंकेविरुद्ध नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी दिली आणि त्याचा परिणाम दिसून येतच आहे. यासाठी भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा याने रोहितचे कौतुक केले आहे.
श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने आपल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दिमुथ करूणारत्ने याला बाद केले आणि त्याने सात षटकांत दोन षटके निर्धाव टाकली आणि 16 धावांत तीन बळी घेतले.
त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा (Akash Chopra) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे कौतुक केले आणि म्हणाला, “मी सर्वप्रथम मोहम्मद सिराजच्या संदर्भात रोहित शर्माची प्रशंसा करेन. मोहम्मद शमी (Mohammad Shami) उपलब्ध असल्याने मोहम्मद सिराजला नवा चेंडू देऊ नये, अशी चर्चा होती. कर्णधार खेळाडू घडवतो. एखाद्याचे करिअर खराब करणे सोपे असते पण ते बनवणे खूप अवघड असते.”
तो पुढे म्हणाला, “शमी अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि चमकदार कामगिरी करत आहे पण जर रोहितने सिराजला साथ दिली नसती तर कदाचित तुम्हाला या विश्वचषकात त्याची जादू पाहायला मिळाली नसती. परंतु आता त्याचा फाॅर्म परत आला आहे.”
चोप्रा पुढे बोलताना म्हणाला, “भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे तुम्हाला त्यांचे कौतुक करत राहावे लागेल. त्यांनी सातपैकी सात सामने जिंकून प्रथम उपांत्य फेरी गाठली आहे. खरे सांगायचे तर या स्पर्धेत भारतापेक्षा चांगला संघ आम्ही पाहिलेला नाही.”
भारतीय संघाने विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आणि त्यातील सातही सामने भारताने जिंकले आहेत. भारतीय संघाचा पुढील सामना 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. (Akash Chopra made a big statement taking Rohit name saying Ruins anyone career)
म्हत्वाच्या बातम्या
वनडे क्रिकेटमध्ये मुजीब बनला अफगाणिस्तानचा चौथा यशस्वी गोलंदाज, पहिल्याच षटकात नेदरलँड्सला मोठा धक्काबिग ब्रेकिंग! तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नेपाळ संघ 2024च्या टी20 वर्ल्डकपसाठी पात्र