भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, त्याने विश्वचषक 2019 स्पर्धेदरम्यान त्याच्यासोबत झालेल्या अन्यायामागे बीसीसीआयचे धक्कादायक गुपीत सांगितले आहे. रायुडूने बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या निवडकर्त्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यानंतर आता थेट त्याच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्याचवेळी त्यांनी आता असे एक काम केले आहे ज्यामुळे अनेक जण त्याचे कौतुक करतायेत.
आयपीएल नंतर निवृत्ती घेतल्यावर रायडू अनेक सामाजिक कार्यांमध्ये दिसून येतोय. त्याचाच एक भाग म्हणून त्याने नुकतीच त्याने आपण शिकलेल्या शाळेला भेट दिली. आंध्र प्रदेशातील मुतलुरु येथील सेंट झेवियर्स स्कूल या शाळेला भेट दिल्यानंतर त्याने शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे पाच लक्ष रुपयांचा मदत निधी जमा केला. तसेच शाळेच्या डागडूजीचा व मैदानावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शब्द देखील त्याने दिला. या शाळेने आपल्या जीवनात मोठी भूमिका बजावली असल्याचे त्याने ट्विट करत म्हटले.
रायुडू काही दिवसांपूर्वी तो आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची भेट घेण्यासाठी पोहोचला होता. यावेळी त्याची पत्नी त्याच्यासोबत होती. रायुडू आपल्या मूळ गावाच्या विकासासंदर्भातील चर्चा करण्यासाठी रेड्डी यांच्याकडे गेल्याचे सांगण्यात आलेले. तो लवकरच सक्रिय राजकारणात सहभागी होऊ शकतो असे देखील अनेकांनी म्हटले आहे.
रायुडूने मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलसह भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. चेन्नई सुपर किंग्सला पाचव्यांदा विजेतेपद मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर त्याने अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट या स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता. मात्र, त्यानंतर त्याने माघार घेतली.
(Ambati Rayudu Donated 5 Lakhs To His Childhood School)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद