इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२० साठी सर्व संघ युएईला पोहोचले आहेत आणि त्यांची जोरदार तयारी सुरू आहे. मैदानावरील नेट प्रॅक्टिसबरोबरच खेळाडू स्वत: ला फ्री ठेवण्यासाठी मनोरंजन व स्विमिंग पूलचा आनंद घेत आहेत. यातच मुंबई इंडियन्सचा खेळाडू राहुल चहरने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अन्य संघ सहकाऱ्यांसह गंमतीच्या मूडमध्ये दिसत आहे.
यावेळी सर्वच संघांनी नेट प्रॅक्टिससाठी गोलंदाज नेले आहेत. त्यामुळे प्रत्येक संघात त्यांच्या मुख्य संघासोबत बाकी खेळाडूही दिसतात. अगदी पुर्वी आयपीएल खेळलेले काही खेळाडू यावेळी युएईला केवळ नेटमध्ये गोलंदाजी करायला गेलेले आहेत. त्यात मुंबई इंडियन्सच्या नेटमध्ये गोलंदाजी करणाऱ्या फलंदाजांच्या ताफ्यात अर्जुनचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविषयी बोलायचं झालं तर फलंदाजी करणाऱ्या व मोठे फटके मारणाऱ्या फलंदाजांमुळे संघ खूपच मजबूत बनला आहे. परंतु अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि चांगल्या फिरकीपटूंचा अभाव यामुळे या संघाला आयपीएल २०२०चे विजेतेपद वाचवण्याची शक्यता कमी झाली आहे. हा संघ आपले बहुतांश आठ सामने अबूधाबीच्या सावकाश खेळपट्ट्यांवर खेळणार आहे आणि या परिस्थितीशी सामंजस्य राखणे संघासाठी खूप आवश्यक आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक या सलामीवीर जोडीवर मुंबई इंडियन्सची फलंदाजीची जबाबदारी असणार आहे, तर ऑस्ट्रेलियन ख्रिस लिनही गरज भासल्यास एक चांगला पर्याय असेल. गतविजेता संघ १९ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध स्पर्धेच्या पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. फोटोत राहुल चहर, जेम्स पॅटिन्सन, युद्धवीर चरक, मोहसीन खान आणि ट्रेंट बोल्ट हे खेळाडू दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CFHlYugBoaH/?utm_source=ig_web_copy_link
अर्जुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, जे सचिन करू शकला नाही. सचिन तेंडुलकरला वेगवान गोलंदाज बनण्याची इच्छा होती, पण ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिलीने त्याला फलंदाज होण्याचा सल्ला दिला. सचिनची उंची कमी होती. त्यामुळे लिलीने त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने राष्ट्रीय संघात पदार्पण करण्याआधीच तो प्रसिद्ध होत आहे. अर्जुन आपली अष्टपैलू कामगिरी करत, तर कधी विराट कोहलीला नेट प्रॅक्टिस करून चर्चेत आला आहे. बिहार कूच ट्रॉफी, मुंबई लीग टी२० अशा अनेक स्पर्धांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे. अर्जुन राष्ट्रीय संघात येण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन स्वत: ची तयारी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आणि धोनीच्या सीएसकेला आयपीएल जिंकून देणार ३९ वर्षांचा ‘हा’ ढाण्या वाघ
-अनुष्काने शेअर केलेल्या फोटोवर पती विराटने केली हृदयस्पर्शी कमेंट
–क्रिकेट जगतात खळबळ! दोन क्रिकेटरचे मॅच फिक्सिंग प्रकरणी निलंबन
ट्रेंडिंग लेख-
-रोहित-विराटला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे हे ५ फलंदाज…
-आयपीएल इतिहासातील ५ सर्वोच्च वैयक्तिक खेळी; २ खेळाडूंनी तर दोनदा केलाय हा पराक्रम