भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत शनिवारी (2 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघ या सामन्यासाठी जोरात तयारी करत आहेत. अशातच पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खान याने विराट कोहलीचे कौतुक केले आहे. भारतीय संघ शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आपल्या अभियानाची सुरुवात करणार आहे. तर यजमान पाकिस्तानचा हा दुसरा सामना असेल.
स्टार स्पोर्ट्सने शादाब खान याची नुकतीच मुलाखत घेतली असून त्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात शादाब भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) याचे कौतुक करत आहे. विराटने मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध हातातून निसटलेला सामना भारताला जिंकवून दिला होता. त्याने 19व्या षटकात हॅरिस रौफ याची चांगलीच कुटाई केली होती. या सामन्यानंतर पाकिस्तान संघ शनिवारी पहिल्यांदा भारतासोबत खेळताना दिसेल. तत्पूर्वीच शादाब खानने विराटचे कौतुक केले. विराटने हॅरिस रौफ याला दोन लागोपाठ षटकार मारले होते, त्याचाही शादाबकडून उल्लेख केला गेला.
Shadab Khan with King Kohli….!!!
– A lovely moment. [Hotstar] pic.twitter.com/WwkzmSalk8
— Johns. (@CricCrazyJohns) September 1, 2023
स्टार स्पोर्ट्सच्या व्हिडिओत शादाब खान म्हणत आहे की, “विराट एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, यात शंकाच नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये माईंड गेम महत्वाचा ठरतो. कारण त्याठिकाणी पोहोचल्यानंतर तुमच्याकडे शैली असतेच. पण गोलंदाज आणि फलंदाज एकमेकांचा माईंड कशा प्रकारे रीड करत आहेत, हे महत्वाचे ठरते. सोबतच सामन्यातील परिस्थिती देखील महत्वाची ठरते. विराट ज्या पद्धतीनेचा फलंदाज आहे आणि त्याने आनेकदा आमच्या विरुद्ध चांगले प्रदर्शन केले. मागचा सामना देखील विराटने आमच्या हातून हिसकावून नेला. नला वाटत नाही की त्यावेळी विराटच्या जागी जगातील इतर कोणता फलंदाज, तर त्याला सामना जिंकता आला असता. विराट कोणत्याही परिस्थितीत संघासाठी काहीही करू शकतो, हेच त्याचे सौंदर्य आहे.”
"Virat Kohli is a world-class player".@76Shadabkhan talks about @imVkohli ahead of the greatest rivalry! 👀🤝🏻
Tune-in to #INDvPAK on #AsiaCupOnStar
Tomorrow | 2 PM | Star Sports Network #Cricket pic.twitter.com/Rv1RAhZua2— Star Sports (@StarSportsIndia) September 1, 2023
दरम्यान, भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ पूर्ण तायारीत दिसत आहे. पण दुसरीकडे भारतीय संघ मात्र, खेळाडूंच्या दुखापती आणि फिटनेसशी तोंड देताना दिसत आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने आपली प्लेइंग एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी रात्री घोषित केली. (Asia Cup 2023 INDvsPAK Shadab Khan praises Virat Kohli)
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन –
फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघातून बाहेर असलेला ‘हा’ खेळाडू निघाला परदेशात, करणार ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व
ASIA CUP 2023 । विराट आणि हॅरिस रौफमध्ये हळाभेट, चाहत्यांना आठवले दोन गगणचुंबी षटकार