वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज खेळाडू आणि ‘यूनिवर्स बॉस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने टी-२० क्रिकेमटध्ये असा एकही गोलंदाज नसेल सोडला ज्याच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला नसेल. जगातील प्रत्येक टी -२० लीग स्पर्धेत खेळणारा गेल नेहमी आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे आणि गमतीदार व्हिडिओमूळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. सध्या तो पाकिस्तानमध्ये सुरू असलेली पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळत आहे. टी -२० क्रिकेट मध्ये त्याच्या नावे अनेक विक्रम आहेत. अशातच त्याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. यावेळी त्याने रोहित शर्माला मागे टाकले आहे.
भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्माने आतापर्यंत ११ देशात जाऊन अर्धशतक झळकावले होते. याचबरोबर गेलने देखील ११ देशांमध्ये जाऊन अर्धशतक झळकावले होते. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्यात गेलने ६८ धावांची खेळी करत रोहित शर्माला मागे टाकले आहे. पाकिस्तानमध्ये अर्धशतक झळकावत त्याने १२ देशात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
गेलने आतापर्यंत जगभरातील १२ देशात जाऊन टी -२० लीग स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्याने भारतात खेळलेल्या टी -२० सामन्यांमध्ये ३७ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. याव्यतिरक्त वेस्ट इंडीजमध्ये २०, इंग्लंडमध्ये ७, दक्षिण आफ्रिकेमध्ये ७, न्यूजीलंडमध्ये १, ऑस्ट्रेलियामध्ये ७, जिम्बाब्वेमध्ये ३, बांग्लादेशमध्ये ११, अमेरिकामध्ये ३, श्रीलंकामध्ये ३, यूएईमध्ये ८ आणि पाकिस्तानमध्ये १ वेळेस त्याला ५० पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत.
रोहितच्या जगभरातील ११ देशात ५० पेक्षा अधिक धावा
रोहितने ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये भारत व्यतिरिक्त दक्षिण अफ्रीका, इंग्लंड , वेस्ट इंडीज, श्रीलंका, बांग्लादेश, यूएई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आयरलँड आणि न्यूझीलंड या देशांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहितने ४४ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा भारतातच केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन, २०० धावांची खेळी आणि आम्ही…
ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम!! याच मैदानात झालेत ‘हे’ खास विक्रम
धक्कादायक! सुप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स कार अपघातात गंभीर जखमी