मुंबई । कॅरिबियन प्रीमियर लीगमधील २२ वा सामना गयाना अमेझॉन वॉरियर्सने विरुद्ध बार्बाडोज त्रिनिदाद संघात मंगळवारी (1 ऑगस्ट) पार पडला होता. या सामन्यात अमेझॉन वॉरिअर्सने गतविजेत्या त्रिनिदाद संघाला 8 गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात 20 वर्षीय गोलंदाज नवीन उल हकने चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यात तो सामनावीर ठरला असून त्याने चार गडी बाद केले होते
प्रथम फलंदाजी करताना बार्बाडोज संघाने निर्धारित 20 षटकात केवळ 92 धावा केल्या. बार्बाडोजने दिलेल्या 93 धावांचे आव्हान अमेझॉन वॉरिअर्स संघाने अवघ्या 16.4 षटकात पूर्ण केले.
वॉरिअर्स संघाकडून फलंदाजी करताना ब्रँडन किंगने 49 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ४ चौकारही ठोकले. सोबतच निकोलस पूरननेही नाबाद १८ धावांची खेळी केली. इतर फलंदाजांना २ आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
बार्बाडोज संघाकडून गोलंदाजी करताना राशिद खान आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बार्बाडोज संघाकडून खेळताना मिशेल सँटनरने 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 36 धावा केल्या. त्याचबरोबर राशिद खानने 19, वॉल्शने 12 आणि काईल मेयर्सने 10 धावा केल्या, तर कर्णधार जेसन होल्डर शून्यावर बाद झाला.
अमेझॉन वॉरिअर्स संघाकडून गोलंदाजी करताना नवीन उल हकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सोबतच केविन सिन्क्लेअरने 2 आणि ख्रिस ग्रीनने 1 विकेट घेतली.
दरम्यान सँटनरने बार्बाडोजला लाजिरवाण्या विक्रमापासून वाचवले. सीपीएलमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम त्रिनिदाद आणि टोबॅगोचा आहे, जे 2013 मध्ये 52 धावांवर बाद झाले होते. एकेकाळी बार्बाडोज संघ 50 धावांवर बाद होणार असे दिसत होते. पण मिशेल सॅंटरने संघाला तारले.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाचे पाणी पाजण्यासाठी विराट उतरेल ‘या’ ११ खेळांडूसोबत
-आता रैना म्हणतो; सीएसकेत परत येणार, पण फक्त या व्यक्तीसाठी
-सुरेश रैना आयपीएल खेळणार नसल्याची ‘या’ खेळाडूने केली होती सहा वर्षांपूर्वी भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
-६० च्या दशकातील वेस्ट इंडिज संघाचे संकटमोचक बसील बूचर
-पाकिस्तानी दिग्गजाला माकडउड्या मारायला लावणाऱ्या किरण मोरेंची गोष्ट
-चेन्नईच्या धोनीने ‘या’ विक्रमात टाकलंय मोठ-मोठ्या फलंदाजांना मागं, रोहित तर आसपासही नाही