भारतीय संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया 6व्यांदा विश्वचषक विजेता बनला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेविस हेड हा विजयाचा नायक ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता याच निर्णयाबाबत ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने खुलासा केला आहे.
अहमदाबाद येथील खेळपट्टीचा विचार केल्यास नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेईल असे सर्व समीक्षक सांगत होते. मात्र, कमिन्स याने गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली. याचबाबत वॉर्नर याला विचारले असता तो म्हणाला,
“सामन्याच्या आदल्या रात्री आमची जवळपास एक-दीड तास बैठक झाली. यामध्ये आम्ही मोठी चर्चा केलेली. परिस्थिती, सर्व आकडेवारी यांचा विचार करून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. मात्र, सामन्याच्या काही तास आधी खेळपट्टी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा यावर सर्वांचे मत मागितले गेले. त्यावेळी जास्तीत जास्त लोकांनी प्रथम गोलंदाजी असे म्हटल्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला.”
या सामन्यात भारतीय संघाने विराट कोहली व केएल राहुल यांच्या अर्धशतकांमुळे 241 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच सामना संपवला. भारतीय गोलंदाजांनी फक्त 47 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड याने 137 धावांची शतकी खेळी व त्याला मार्नस लॅब्युशेन याने नाबाद अर्धशतक करून साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विजय मिळवला.
(David Warner Reveal Why Cummins Took First Bowling Decision In ODI World Cup Final)
हेही वाचा-
जमलं रे! भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यरने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी विभागाची ताकद वाढणार! 2 माजी दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा कोण आहेत ते