वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा संपताच सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या याच्या जागी सूर्यकुमार यादव संघाची धुरा सांभाळणार आहे. तसेच, 3 सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच, अखेरच्या 2 सामन्यात श्रेयस अय्यर उपकर्णधाराच्या रूपात संघाशी जोडला जाईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोषित झालेल्या संघात युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा विस्फोटक फलंदाज शिवम दुबे (Shivam Dube) याचाही समावेश आहे. शिवम दुबे 15 सदस्यीय संघात जागा दिली आहे. तो यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचाही भाग होता. त्याच्या प्रदर्शनामुळे निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवत, त्याला संघात घेतले आहे.
आयपीएलमध्ये कहर पराक्रम
खरं तर, सीएसके (CSK) संघाकडून आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत खेळताना शिवमने शानदार प्रदर्शन केले होते. त्याने 16 सामन्यात 38च्या सरासरीने आणि 158.33च्या स्ट्राईक रेटने 418 धावा केल्या होत्या. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश होता. याव्यतिरिक्त या आयपीएलमध्ये तो सर्वाधिक 35 षटकार मारणारा भारतीय फलंदाजही होता. अंतिम सामन्यात त्याने नाबाद 32 धावांची शानदार खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार (ind vs aus t20 series csk player select in team india for t20 series against australia )
हेही वाचा-
जमलं रे! भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यरने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल
पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी विभागाची ताकद वाढणार! 2 माजी दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी, वाचा कोण आहेत ते