भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (17 मार्च) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने सांघिक कामगिरी करत 5 विकेट्सने सामना खिशात घातला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (19 मार्च) विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
पहिला सामना भारतीय संघाने नावे केल्यानंतर दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध असेल. कौटुंबिक कारणाने तो मुंबई येथील सामना खेळू शकला नव्हता. असे असले तरी दुसरा सामना पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
विशाखापट्टणम येथे रविवारी संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण असेल. दुपारी पावसाची शक्यता नसली तरी, आकाशात काळे ढग जमा असतील. सायंकाळच्या सत्रात येथे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही काळ पाऊस पडल्यानंतर पुन्हा खेळ सुरू होऊ शकतो. कारण, या मैदानाची ड्रेनेट सिस्टीम ही चांगली समजली जाते. परंतु, पावसाचा जोर वाढल्यास सामना पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
दुसऱ्या सामन्यासाठी उभय संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
भारत – शुबमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, मिचले मार्श, स्टीव स्मिथ, मार्नल लाबुशेन, कॅमरून ग्रीन, जोस इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, शॉन एबॉट, मिचेल स्टार्क, एडम झंपा.
(India V Australia 2nd ODI Vishakhapatnam Might Be Rain Play Role Rohit Sharma Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीसंतच वेगळंच असतं! आयपीएलसाठी पाठिंबा एका संघाला आणि जिंकण्याची प्रार्थना दुसऱ्या संघासाठी
महिला आरसीबीच्या सुमार खेळीसाठी विराट, डिविलियर्स आणि ‘हा’ दिग्गज जबाबदार? माजी गोलंदाजाचे मोठे विधान