लखनऊ। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकन महिला क्रिकेट संघ यांच्यात सुरु असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना शनिवारी(२० मार्च) खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकन महिला संघाने भारतीय महिला संघाला ८ गडी राखून पराभूत केले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकन संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता आज (२१ मार्च ) खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर होऊ शकते.
पहिल्या टी -२० सामन्यात दक्षिण आफ्रिकन महिला संघाने विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने १३० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दक्षिण आफ्रिकन महिला संघाच्या खेळाडूंनी १९.१ षटकात ८ गडी राखून पूर्ण केले होते. तसेच हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्मृती मंधानाला पहिल्या टी२० सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तिचे आजच्या सामन्यात खेळणे कठीण दिसून येत आहे.
झाले असे की, पहिल्या टी२० सामन्यातील दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लुसने शॉट खेळला तो चेंडू शेफाली वर्माच्या हातात गेला, तिने थ्रो केला आणि तो थ्रो अडवण्यासाठी गेलेल्या स्मृतीच्या पायातील मांसपेशी खेचल्या गेल्या. त्यामुळे तिला मैदानाबाहेर देखील जावे लागले होते.
तसेच सामना झाल्यानंतर ती म्हणाला होती की, “मला हे पहावे लागेल की रात्री हे दुखणं कमी होत आहे का. आता थोडे ठीक वाटत आहे. उद्या कसे असेल ते पाहणे महत्त्वाचे आहे.”
तसेच सामन्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “आम्ही खूप संघर्ष केला. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. १८ व्या षटकात मला असे जाणवले की, आम्ही १० धावा कमी केल्या.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी १४ जणांच्या इंग्लंड संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचे ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक
सचिनने मारली लाराला स्कुटीवरून रपेट, दिला ‘हा’ खास संदेश, पाहा व्हिडिओ