इंडियन प्रीमियर लीगचा नुकताच झालेला २०२० चा हंगाम हा आयपीएलच्या 13 वर्षाच्या इतिहासातील सर्वात रोमांचक हंगाम ठरला आहे. कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत स्पर्धेने प्रेक्षकांना आवश्यक ते मनोरंजन पुरवले आणि त्यांना सामने टीव्हीवर पाहण्यासाठी खिळवून ठेवले.
आयपीएलचा हा सर्वात स्पर्धात्मक हंगाम होता कारण शेवटच्या सामन्यापर्यंत अंतिम 4 संघ निश्चित झाले नव्हते. शिवाय पॉइंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर असणाऱ्या संघाकडे पहिल्यांदाच बारा गुण होते.
10 नोव्हेंबर रोजी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम सामन्यात पराभूत केले आणि पाचव्यांदा आयपीएलचा प्रतिष्ठित टी -20 करंडक जिंकला. ही स्पर्धा टीव्हीवर पाहणाऱ्यांची संख्या यंदा 28 टक्क्यांनी वाढली आहे.
टी -20 लीगच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पधेर्चे प्रायोजक ड्रीम 11 चे कौतुक केले.
आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल यांनी स्टार स्पर्ट्सशी बोलताना सांगितले की, “आयपीएलने नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी जागतिक दर्जाची क्रीडा स्पर्धा देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आयपीएल 2020 चे मुख्य प्रायोजक म्हणून ड्रीम 11 पुढे आले. आम्हाला खेळाच्या माध्यमातून चाहत्यांची वाढती डिजिटल संख्या पाहून आनंद झाला. ”
ते म्हणाले, “हे पाहणे तितकेच समाधानकारक आहे की ड्रीम 11 ने बऱ्यापैकी भारतीयांना ड्रीम 11 आयपीएल सामन्यांमध्ये एकत्र केले आहे.”
ते म्हणाले. ड्रीम 11 चे मुख्य विपणन अधिकारी, विक्रांत मुदालियार यांनी सांगितले की आयपीएल हा भारतातील सर्वात मोठा खेळ इव्हेंट आहे. जो सर्वाधिक परीक्षकांच्या पसंदी असल्याचा साक्षीदार आहे आणि ड्रीम ११ मध्येही अशाच प्रकारची वाढ झाल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला.
“आम्ही करतो त्या प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी क्रीडा चाहते आहेत आणि आम्ही आमच्या एप वापरकर्त्यांना सर्व ड्रीम 11 आयपीएल सामन्यांमध्ये एकत्र केले आहे,” असे विक्रांत पुढे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीने नक्की काय सल्ला दिला की ऋतुराजने ठोकली सलग तीन अर्धशतके, घ्या जाणून
हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव पुन्हा गोल्फ कोर्सवर, पाहा व्हिडिओ
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस
ट्रेंडिंग लेख –
…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!
…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!
…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’