जपान येथे पार पडलेल्या जपान ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर 750 या मालिकेतून किदांबी श्रीकांत बाहेर पडला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोरियाच्या ली डॉंग केन याने श्रीकांतचा उप-उपांत्य सामन्यात 21-19, 16-21, 18-21 असा पराभव केला. 7 लाख डॉलरच्या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
पहीला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सामना 5-5 अश्या बरोबरीत असताना केन आक्रमक खेळ करत 12-5 अशी आघाडी घेतली. श्रीकांतने खूप प्रयत्न करूनही आघाडी 16-18 अशी कमी केली. त्यानंतर केनने मुसंडी मारत सरळ 3 पॉईंट जिंकत सेट आपल्या नावावर केला.
तिसऱ्या सेट मध्ये सामना कधी श्रीकांत कडे तर कधी केन केन कडे झुकत होता. एक वेळ तर 15-15 अशी बरोबरी होती. शेवटी 18-19 वर असताना केन आपला अनुभव पणाला लावत शेवटचे 2 मॅच पॉंईट जिंकत सामना आपल्या नावावर केला.
मागच्या वर्षी 4 मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीकांतने यावर्षी 9 सिरिज मधे फक्त दोनदा उप-उपांत्य फेरी पार केली आहे.
माजी विश्व नं 1 श्रीकांत आणि त्याच्या सोबत इतर भारतीय खेळाडू आता चीन येथील चांगझोऊ येथे होणाऱ्या चीन ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर 1000 स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशिया कपमध्ये पहिल्यांदाच ‘सुपर ओव्हरचा’ समावेश
-क्रिकेटनंतर श्रीसंतचा मोर्चा या टीव्ही शोकडे