कतार येथे पुरूष फुटबॉल संघांचा 22वा विश्वचषक खेळला गेला. फिफा विश्वचषक (FIFA World cup) 2022च्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि फ्रांस लुसेल स्टेडियमवर समोरा-समोर आले. केवळ थरारक या शब्दात सांगायचे झालेल्या या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवला. जेव्हा उत्तर अमेरिकेच्या कोपऱ्यात असलेला अर्जेंटिना 36 वर्षानंतर फुटबॉलचा जगज्जेता होण्यात सर्वात मोठा वाटा होता तो कर्णधार आणि दिग्गज लिओनल मेस्सी याचा. त्याने आपल्या उल्लेखनीय खेळीने सगळ्यांना अक्षरशः वेड लावले. या लेखामध्ये आपण त्याच्या कारकिर्दीच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ.
अर्जेंटिनाची लोकसंख्या पाहिली तर ती केवळ 5 कोटींच्या आसपास आहे. त्यांनी 1978 आणि 1986 असा दोन वेळा विश्वचषक जिंकलेला. आता त्यांच्याकडे तिसऱ्यांदा विश्वचषक आला. अर्जेंटिनाची जगात एक वेगळीच ओळख मेस्सीमुळे निर्माण झाली आहे.
त्याचबरोबर अर्जेंटिनाचा इतिहास पाहिला तर देशाचे नागरिक नेहमीच राजकिय आणि आर्थिक बाबींमुळे त्रस्त होत आले आहेत. 1983मध्ये अर्जेंटिनामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही आली, त्याच्याआधी सहा वेळा सरकारमध्ये बदल झाला होता. त्याच्या काही काळानंतर एका मुलाचा जन्म झाला, ज्याने पुढे देशाला एक नवी ओळख निर्माण करून दिली.
अर्जेंटिनाच्या रोजारिओमध्ये 24 जून 1987मध्ये एका मुलाचा जन्म झाला. तो मुलगा जन्माला आला फक्त फुटबाॅल खेळायला. देव काही तरी घेतो तर मोबदल्यात खुप जास्त देतो. लहानपणी त्या मुलाच्या हॉर्मोनच्या वृद्धिमध्ये कमतरता होती पण फुटबाॅल खेळायची जिद्द पण तेवढीच. त्यासाठीच त्याला उपचाराला स्पेनमध्ये नेण्यात आले. पुढे उपचार झाल्यावर तो मुलगा एक मोठा फुटबॉलपटू बनला. त्याचे नाव लिओनल मेस्सी (Lionel Messi) जे फुटबाॅल प्रेमींसाठी काही नवीन नाही.
मेस्सीच्या त्या आजारावर उपचार नसते झाले तर त्याची उंची कधीच वाढली नसती. त्याच काळात तो फुटबॉलमध्येही कमालीचा प्रगती करत राहिला. त्याचा खेळ पाहूनच बार्सिलोनाचे स्पोर्टींग डारेक्टर कार्ल्स रॅजॅक यांनी त्याला करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा बार्सिलोना लहान मुले, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी यांच्या खेळावर लक्ष ठेवून होते. त्यांनीच मेस्सीच्या आजाराचा पूर्ण खर्च करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची एकच अट होती. ती म्हणजे मेस्सीने अर्जेंटिना सोडून बार्सिलोनामध्ये स्थायिक व्हावे.
How Messi's #FIFAWorldCup story started 🇦🇷 ❤️
But how will it end? pic.twitter.com/r5bWeRvnmB
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
मेस्सी 2001-02चा हंगाम स्थायिक होण्यात, क्लबच्या ट्रासंफर विंडोची करारबद्ध करण्याची प्रक्रिया सुरू पूर्ण करण्यात गेला. यामुळे त्याला बार्सिलोनाच्या बी संघात स्थान मिळाले. पुढे त्याने 16 ऑक्टोबर 2004 साली बार्सिलोना एफसीसाठी पदार्पण केले होते. तो जवळपास दोन दशके या क्लबकडून खेळला. या दरम्यान त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याने बार्सिलोनाकडून एकूण 672 गोल केले आहेत. त्याने या क्लबकडून खेळताना युइएफए चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यांत 28 गोल केले आहेत.
फुटबाॅलमध्ये सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या बॅलोन डीओर अवॉर्डचा मेस्सी सर्वाधिक (7) वेळेस मानकरी ठरला आहे. एका वर्षात आणि एका हंगामामध्ये क्लबसाठी सर्वाधिक गोल ला लीगामध्ये, सर्वाधिक असिस्ट, एका हंगामात सर्वाधिक गोल आणि 300 गोल करणारा मेस्सी प्रथम फुटबाॅलपटू ठरला. त्याने आठ वेळा पिचीची पुरस्कारही पटकावला.
मेस्सीने 2006मध्ये विश्वचषकात पदार्पण केले. त्या स्पर्धेत तो अर्जेंटिनाकडून खेळणारा आणि गोल करणारा युवा खेळाडू ठरला होता. पुढे तो 2011मध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार झाला आणि त्याने 2014च्या विश्वचषकात संघाला अंतिम फेरीत प्रवेश करून दिला. या स्पर्धेत त्याने 4 गोल केले आणि उत्तम कामगिरीच्या जोरावर गोल्डन बॉल हा पुरस्कारही पटकावला. त्याचबरोबर त्याने राष्ट्रीय संघाला 2015 आणि 2016 असे सलग कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवले.
मेस्सीने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेतली होती, मात्र तो परत संघात परतला. त्याने संघाला 2018च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्यास महत्वाची भुमिका बजावली. त्याचबरोबर त्याने 2021मध्ये कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली. ज्यामध्ये तो गोल्डन बॉल आणि गोल्डन शूजचा मानकरी ठरला.
2005 ⏩ 2022
The evolution of Leo Messi 🇦🇷 #FIFAWorldCup #Qatar2022 pic.twitter.com/dwi0PIUAiK
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
क्लब आणि देशासाठी एका वर्षात सर्वाधिक गोल (91 गोल 2012मध्ये) करण्याचा विक्रम गिनिस वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये मेस्सीने आपल्या नावावर केला आहे. एक वर्षात देशासाठी सर्वाधिक गोल्स (12) चा विक्रम पण त्याने आपल्या नावावर केला आहे. त्याने अर्जेंटिनाकडून आतापर्यंत सर्वाधिक असे 171 सामने खेळताना सर्वाधिक 96 गोल केले आहेत. याबरोबर तो आजच्या घडीला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विश्वचषकात अर्जेंटिनाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याने याच विश्वचषकात केला आहे. आता आपल्या याच दैदिप्यमान कारकिर्दीत विश्वचषक रूपी मानाचा तुरा रोवत त्याने आपली फुटबॉल कारकीर्द सार्थ लावली. आता त्याने आधी जाहीर केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर तो पुन्हा खेळताना दिसणार नाही. मात्र, त्याने त्याच्या चाहत्यांना आजवर दाखवलेले क्षण सर्वांच्या लक्षात नेहमीच राहतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अरे, त्याला बाहेरच बसवा’, भारताच्या दिग्गजाचे रोहितबाबत मोठे भाष्य
आयपीएलचा ‘फ्लॉप करोडपती’ गाजवतोय बिग बॅश! यंदाही ठेवलीये मालामाल होण्याची अपेक्षा