पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांना ही जबाबदारी पुन्ही स्वाकरण्यासाठी पीसीबीकडून विचारले गेले होते. मात्र, आर्थर सध्या डर्बिशायर संघासोबत कार्यरत आहेत आणि याच कारणास्तव त्यांनी पीसीबीचा प्रस्ताव देखील नाकारला. मंगळवारी (10 जानेवारी) पीसीबीने स्वतः याविषयी माहिती दिली होती. पण या प्रकरणात आला नवीन माहिती समोर येत आहे.
पीसीबीने मंगळवारी सांगितले की, संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी दक्षिण आफ्रिकेच्या मिकी आर्थर (Mickey Arthur) यांच्याशी चर्चा सुरू होती. पण आर्थरने असे कारण दिले की, ते डर्बिशायर संघासोबत पुढच्या मोठ्या काळासाठी करारबद्ध आहेत, ज्यामुळे त्यांना पाकिस्तान संघाची जबाबदारी स्वीकारता येणार नाही. मात्र, पीसीबीच्या एका वरिष्ठ सूत्राकडून अशी माहिती मिळाली आहे की, आर्थरने संघाचे प्रशिक्षकपद न स्वीकरण्याचे कारण म्हणजे, त्यांना क्रिकेटविषयी पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर विश्वास नाहीये. याच कारणास्वत त्यांनी पीसीबीचा प्रस्ताव देखील नाकारला.
सूत्रांच्या हवाल्याने सांगितले गेले की, “सत्य हेच आहे की, पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी अर्थरशी चर्चा केल्यानंतर ते असेच म्हणाले की, त्यांना पुन्हा पाकिस्तान संघासोबत काम करायचे आहे. पण पीसीबीसोबतचा त्यांना जुना अनुभव चांगला नाहीये. 2019 विश्वचषकादरम्यान पीसीबीने त्यांना सांगितले होते की, त्यांचा संघासोबतचा करार वाढवला जाईल. पण संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचल्यानंतरही त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही.”
दरम्यान, मागच्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा फेरबदल पाहायला मिळाला. रमीज राजांना पीसीबी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर नजम सेठींकडे ही जबाबदारी पुन्हा एकदा सोपवण्यात आली. अध्यक्षांसह बोर्डातील इतर महत्वाच्या पदांवर देखील नवीन नावांची निवड केली गेली. अशात आता सध्याचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांना देखील जबाबदारीतून मुक्त केले जाणार असल्याचे सांगितले जाते. फेब्रुवारी 2023 मध्ये मुश्ताक यांचा संघासोबतचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनात पाकिस्तान संघ मागच्या वर्षी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. (Mickey Arthur turned down PCB’s offer for the post of head coach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र केसरी 2023: गादी विभागातून हर्षवर्धन सदगीरची आगेकूच; पुण्याच्या प्रतीक जगतापला सुवर्ण
धोनीला हटवून विराटला हवी होती टीम इंडियाची कॅप्टन्सी! माजी प्रशिक्षकाच्या दाव्याने खळबळ