आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात उशिरा एंट्री मारली ती, टी२० क्रिकेटने. जरी कसोटी आणि वनडे क्रिकेटनंतर या क्रिकेटच्या स्वरुपाचा शोध लागला असला, तरी टी२० क्रिकेटची बातच निराळी आहे. यासाठी एक तर, २१व्या शतकात जगणाऱ्या लोकांच्या जिवनाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आलेला वेग कारणीभूत असावा. नाहीतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटच्या काही वर्षानंतर भारताने सुरु केलेली टी२० लीग कारणीभूत असावी.
२००८मध्ये भारताने सुरु केलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)ला लवकरच प्रसिद्धी मिळाली. तसं तर, २० षटकांच्या या क्रिकेट प्रकारात सहसा ताबडतोब खेळी पाहायला मिळते. पण, आयपीएलमध्ये जसे दमदार विस्फोटक फलंदाज उपलब्ध आहेत, तसेच दमदार गोलंदाजही उपलब्ध आहेत.
अधिकतर कोणत्याही संघाची रणनिती असते, ती सुरुवातीला हळूवार फलंदाजी करण्याची आणि शेवटच्या काही षटकात दमदार फटकेबाजी करण्याची. आयपीएलमध्येही फलंदाज शेवटच्या १७ ते २० षटकांमध्ये धुव्वादार फलंदाजी करताना दिसतात. पण, आयपीएलमध्ये जसे दमदार विस्फोटक फलंदाज उपलब्ध आहेत, तसेच दमदार गोलंदाजही उपलब्ध आहेत.
त्यातही भुवनेश्वर कुमार, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह असे गोलंदाज तर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहेत. त्यामुळे मोठमोठ्या फलंदाजांना त्यांच्यापुढे डेथ ओव्हर्समध्ये (शेवटच्या काही षटकात) फलंदाजी करताना घाम सुटतो. पण, आयपीएलमध्ये असेही काही फलंदाज आहेत, ज्यांनी या दमदार गोलंदाजांचा सामना करत शेवटच्या षटकात अफलातून फलंदाजी केली. या लेखात, आयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या ५ फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे.
आयपीएलच्या शेवटच्या ४ षटकात सर्वाधिक षटकार मारणारे पाच फलंदाज (Most Sixes By Batsman In 17-20 Overs Of IPL Match ) –
५. आंद्रे रसेल – ६२ षटकार
वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांना त्यांच्या फटकेबाजीसाठी ओळखले जाते. त्यांच्या संघात एकापेक्षा एक खतरनाक फलंदाजांची भरणा असतो. अशात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा आपल्या फलंदाजीच्या जोरावार शेवटच्या काही षटकात सामन्याचा चित्र बदलण्याची क्षमता राखतो.
रसेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ५२ डावात फलंदाजी करत ८ अर्धशतकांच्या मदतीने १४०० धावा केल्या आहेत. जर, त्याच्या आयपीएलमधील शेवटच्या काही षटकातील फलंदाजीविषयी बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत शेवटच्या षटकांमध्ये ६२ षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.
रसेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण १२० षटकार मारले आहेत. त्यातील ६२ षटकार त्याने १७-२० या षटकांमध्ये मारले आहेत. यावरुन त्याच्या डेथ ओव्हर्समधील फलंदाजीची आक्रमकता दिसून येते.
४. रोहित शर्मा – ७८ षटकार
आयपीएल सामन्यांच्या शेवटच्या ४ षटकांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. रोहित मर्यादित षटकातील त्याच्या विस्फोटक फलंदाजासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याला हिटमॅन हे टोपणनाव देखील देण्यात आले आहे.
आयपीएलमध्ये या धुरंधर फलंदाजांने आपली छाप पाडली आहे. बऱ्याचदा सलामीला फलंदाजी करणारे फलंदाज आयपीएल सामन्याच्या शेवटपर्यंत देखील टिकून राहतात. अशावेळी ते शेवटच्या काही षटकात दमदार फटकेबाजी करत धावा करण्याचा प्रयत्न दिसतात. रोहितने आयपीएल सामन्यांच्या १७-२० षटकांदरम्यान फलंदाजी करताना आतापर्यंत ७८ षटकार मारले आहेत.
३. एबी डिविलियर्स – ८३ षटकार
दक्षिण आफ्रिकाच्या यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्सला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणले जाते. मिस्टर ३६० डिग्री नावाने क्रिकेटजगतात प्रसिद्ध असणारा डिविलियर्स हा मैदानावर मोठे मोठे शॉट्स मारताना दिसतो. आयपीएलमध्येही त्याची विस्फोटक फलंदाजी अनेकदा पाहायला मिळाली आहे.
डिविलियर्स हा आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा प्रमुख फलंदाज आहे. त्याची आयपीएल कारकिर्द दमदार राहिली आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५४ सामने खेळत ३ शतकांच्या मदतीने ४३९५ धावा केल्या आहेत.
डेथ ओव्हर्समधील त्याची फलंदाजीदेखील दमदार राहिली आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये ८३ षटकार मारले आहेत.
२. कायरन पोलार्ड – ९२ षटकार
वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्डला त्याच्या षटकार मारण्याच्या क्षमतेवरुन २०१०मध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हापासून पोलार्डने त्याच्या खतरनाक फलंदाजीच्या जोरावर आजवर मुंबई इंडियन्सला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
आयपीएलच्या १४८ सामन्यात १७६ षटकार मारणाऱ्या पोलार्डने आतापर्यंत आयपीएलच्या १७-२० षटकांमध्ये एकूण ९२ षटकार मारले आहेत. यासह तो आयपीएलच्या शेवटच्या ४ षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दूसऱ्या क्रमांकावर आहे.
१. एमएस धोनी – १३६ षटकार
आयपीएलच्या शेवटच्या ४ षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी हा अव्वल क्रमांकवर विराजमान आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक १३६ षटकार मारले आहेत. यासह तो डेथ ओव्हर्समध्ये १००पेक्षा जास्त षटकार मारणारा एकमेव फलंदाज आहे.
ट्रेंडिंग लेख –
किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप
आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल
असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे
महत्त्वाच्या बातम्या –
सुरेश रैना आयपीएल खेळणार नसल्याची ‘या’ खेळाडूने केली होती सहा वर्षांपूर्वी भविष्यवाणी
आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने सर्वांसमोर दिली होती गर्लफ्रेंडला शिवी, आता होतं नाहीये लग्न
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय: ‘या’ दिग्गजाची प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती