मुंबई । राजस्थान रॉयल्सचा इंग्लिश खेळाडू जोफ्रा आर्चर आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीची गती दाखवण्यासाठी सज्ज आहे. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजामध्ये धाक निर्माण केला. मागील वर्ष आर्चरसाठी खूप संस्मरणीय होते, जिथे त्याने प्रथमच इंग्लड संघाला विश्वविजेता बनविण्यात मोलाची कामगिरी केली. पण अलीकडे, आर्चर आपल्या मैत्रिणीमुळे चर्चेत आला आहे.
कोरोनानंतर जुलैमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. या मालिकेसाठी, सुरक्षिततेशी संबंधित नियम होते, जे कोणताही खेळाडू खंडित करू शकत नाहीत. पण आर्चरने आपली गर्लफ्रेंड ड्रुआना बटलरसाठी हा नियम मोडला.
वास्तविक पहिल्या कसोटी सामन्यानंतर सर्व खेळाडूंना साऊथॅम्प्टनहून वेगवेगळ्या वाहनांनी मँचेस्टरला जावे लागले. मॅनचेस्टरला जाण्यासाठी दोन तास आधी आर्चरने त्याची मैत्रीण राहत असलेल्या ब्रिग्टन येथे त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर आर्चर परत आल्यानंतर त्याला एकट्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. पण त्याच्या या हालचालीने संपूर्ण संघ घाबरला. नंतर आर्चरने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आर्चरचे तिच्यासोबत प्रेमसंबंध आहेत.
आर्चरला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची मैत्रीण ड्रुआना स्टेडियममध्ये उपस्थित असते. आयपीएलमध्येही ती सर्वांसाठी ‘मिस्ट्री गर्ल’ राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ
दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला
भारतात परतल्यानंतर सीएसकने रैनाला व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढले; आता संघात पुनरागमन…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा
वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज
३ असे भारतीय दिग्गज, ज्यांनी केल्यात कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा