मुंबई । पाकिस्तानी प्रसार माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की, कदाचित निवड समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला देण्यात येईल. शोएबनेही या नव्या जबाबदारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. परंतु रविवारी पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी मिस्बाह-उल-हकवर विश्वास दाखवला. मिस्बाह सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम राहत असल्याचे सांगितले आणि सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला.
गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये शोएबने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांची भेट घेतल्याची बातमी होती. पण जेव्हा पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूजने पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांना याबाबत विचारले तेव्हा त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
ते म्हणाले, “या फक्त अफवा आहेत आणि असं काही नाही. यावेळी निवड समितीत कोणतेही बदल करण्याची आमची कोणतीही योजना नाही. आम्ही हे कसे करू शकतो? आम्ही आधीच स्पष्ट केले आहे की, सर्व प्रमुख पदांचा निश्चित वेळ पूर्ण झाल्यावर पुनरावलोकन केले जाईल आणि त्यानंतर या पदांसाठी निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे याक्षणी समितीमध्ये कोणतेही बदल करण्याचे कारण नाही.”
गुरुवारी, ‘क्रिकेटबझ’ या यूट्यूब कार्यक्रमात अख्तरने सांगितले होते की, जर आपल्याला अशी ऑफर मिळाली तर तो नकार देणार नाही.
तो म्हणाला होता, “मी बोर्डाशी काही चर्चा केली आणि मला पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी भूमिका निभावण्यात रस आहे. परंतु अद्याप काहीही निश्चित झाले नाही. मी खूप आरामदायक आयुष्य जगतो. मी माझ्या स्वत: च्या अटींनुसार क्रिकेट खेळलो, पण आता आयुष्य थांबत आहे. मी ही विश्रांती सोडून देण्यास तयार आहे आणि पीसीबीबरोबर काम करण्याची इच्छा आहे. मी इतरांच्या सल्ल्याला घाबरत नाही. मला संधी मिळाली तर मी वेळ देईन.” अख्तरने पीसीबीच्या वरिष्ठ अधिकार्यांशी झालेल्या चर्चेची माहिती देण्यास नकार दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
-खुशखबर: मार्चनंतर पहिल्यांदाच पाहायला मिळणार प्रेक्षकांचा जल्लोष, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने…
-आयपीएल सुरू होण्यापूर्वी या खेळाडूने केली सिंहगर्जना; म्हणाला, आम्हीच जिंकणार आयपीएलचे जेतेपद
-माजी दिग्गजही झाला विंडीजच्या ‘या’ खेळाडूचा चाहता; केली डिविलियर्ससोबत बरोबरी
ट्रेंडिंग लेख-
-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय
-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!
-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान