Prithvi Shaw : भारतीय संघातून बाहेर असलेला उजव्या हाताचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये वनडे चषक (One Day Cup) खेळत आहे. नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणाऱ्या या फलंदाजाने सोमवारी (29 जुलै) मिडलसेक्सविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले.
पृथ्वी शॉ भारतीय संघातून बाहेर असला तरी, पुनरागमन करण्यासाठी तो सतत धावा करत आहे. तो सध्या इंग्लंडमध्ये आहे जिथे तो वनडे चषक खेळतोय. नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने सोमवारी आपल्या आक्रमक फलंदाजीने मने जिंकली. शॉने मिडलसेक्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. शॉने 58 चेंडूत 76 धावा केल्या. मात्र, शॉला त्याच्या इतर सहकारी फलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळेच त्याच्या उत्कृष्ट खेळीनंतरही नॉर्थम्प्टनशायर अडचणीत आला.
FIFTY FOR PRITHVI SHAW…!!!
– 50* from just 33 balls, he is coming in very good touch, a big domestic season awaits ahead of the IPL auction ⭐ pic.twitter.com/0Y0cZM6aNv
— Johns. (@CricCrazyJohns) July 29, 2024
मिडलसेक्सविरुद्ध नॉर्थम्प्टनशायरचे वरच्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. कठीण खेळपट्टीवर केवळ शॉने शानदार फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून 12 चौकार आणि 1 षटकार आला. मात्र, त्याचे सहकारी फलंदाज मात्र सपशेल फ्लॉप झाले. एमिलियो 1, रिकार्डो वास्कोनसेलोस 6, कर्णधार लुईस मॅकमॅनस 2 धावांवर बाद झाले. शॉने मात्र इतर फलंदाज बाद होत असतानाही तग धरला. नॉर्थम्प्टनशायरने 18.3 षटकांत 117 धावा केल्या, त्यापैकी शॉने 76 धावांचे योगदान दिले.
WELL PLAYED, PRITHVI SHAW…!!!
– 76 runs from just 58 balls including 12 fours & 1 six, A cracking innings, sublime touch in One-Day Cup ahead of domestics in India. 🔥 pic.twitter.com/l6heQNx3BD
— Johns. (@CricCrazyJohns) July 29, 2024
शॉने वनडे कपमध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 3 सामन्यात 41 पेक्षा जास्त सरासरीने 125 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे शॉचा स्ट्राइक रेट 123 पेक्षा जास्त आहे. शॉने आपल्या स्फोटक फलंदाजीने इंग्लंडच्या क्रिकेटतज्ज्ञांचीही मने जिंकली आहेत. शॉच्या बॅटमधून अशाच धावा येत राहिल्यास तो, लवकरच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. यासोबतच त्याला आपला फिटनेसदेखील सिद्ध करावा लागेल. त्याने भारतीय संघासाठी अखेरचा सामना तीन वर्षांपूर्वी खेळला होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी धावा केल्या. मात्र, तरीदेखील त्याला भारतीय संघात जागा बनवता आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित, विराट, श्रेयस श्रीलंकेत पोहोचले; वनडे मालिकेसाठी लवकरच सरावालाही करणार सुरुवात
पॅरिस ऑलिम्पिक: अर्जुन बबुताचा निशाना थोडक्यात चुकला..! एअर रायफलमध्ये गमावलं पदक
“गोलंदाजीच्या क्षमतेमुळे रियान परागला…” माजी भारतीय खेळाडूचा मोठा दावा