भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दिवसाला रुग्णांचा आकडा मोठा आकडा पार करत आहे. यामुळे देशात लॉकडाऊन असल्याने अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटी त्यांच्या मदतीला धावून येत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध तुफान फटकेबाजी करणारा रवींद्र जडेजा देखील कोरोनाच्या कठीण काळात समाजसेवा करताना दिसून येत आहे. पण मुख्य म्हणजे, त्याने ही गोष्य जगजाहीर केलेली नाही. त्याच्या बहिणीने याबाबतचा खुलासा केला आहे.
अष्टपैलू जडेजा सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. मैदानात चपळ आणि आक्रमक असणारा जडेजा मैदानाबाहेर किती दिलदार आहे? याचा त्याने प्रत्यय दिले आहे. कोरोनाच्या कठीण काळात जडेजाने गरिबांना अन्न पुरवण्यापासून ते रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यापर्यंत, यासोबतच त्यांच्या उपचाराचा खर्च देखील त्यानेच केला होता. त्याचे हे समाजकार्य अजुनही सुरूच आहे.
जडेजाची बहीण नयना हीने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत उलगडा केला आहे. ती म्हणाली, “लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही राजकोटमध्ये असलेल्या गरजू लोकांना राशन देण्याची व्यवस्था केली होती. जडेजा स्वतःहून जात नाही कारण त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमतात. आम्ही आणि आमच्या टीमने त्यांच्या घरी जाऊन अन्नाच्या वस्तू पोहचवल्या.”
तसेच ती पुढे म्हणाली, “यावेळी समस्या थोडी वेगळी आहे. लोक काम करत असतील. परंतु कोरोना रुग्णांना उपचार घेता येत नाहीये. कुठे बेड नाहीत, ऑक्सिजन आणि औषध नाहीत. याबाबतची माहिती मिळताच आम्ही धावून जात आहोत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून ते ऑक्सिजनच्या पुरवठ्यापर्यंत आम्ही मदत करत आहोत.”
जडेजाला प्रसिद्धी नको..
जडेजाचे राजकोटमध्येमध्ये एक ‘जड़्डुस फूड फिल्ड’ नावाचे एक रेस्टॉरंटदेखील आहे. या रेस्टॉरंटमध्ये जवळपास २५ कर्मचारी कार्यरत असतील. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे ते आपआपल्या घरी गेले आहेत. “कोणाचे घर नेपाळमध्ये आहे तर कोणाचे उत्तराखंडमध्ये आहे. या सर्वांना प्रत्येक महिन्याला जडेजा पैसे पोहचवून मदत करत आहे. त्याला प्रसिद्धी नको आहे. तो शांतपणे सर्वांना मदत करत आहे.” असे नयना म्हणाली.
महत्त्वाच्या बातम्या-
DCला कोरोनाचा फटका; २.२० कोटींचा दिग्गज हंगाम अर्ध्यात सोडून मायदेशी परतण्याच्या तयारीत!
बीसीसीआयवर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठं संकट ओढावलं, ३० ऑस्ट्रेलियन स्वदेशी परतणार?
DCला कोरोनाचा फटका; २.२० कोटींचा दिग्गज हंगाम अर्ध्यात सोडून मायदेशी परतण्याच्या तयारीत!