ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाला आव्हान स्वीकारायला आवडते. इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) चे प्रतिनिधित्व करीत, शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्याची त्याची इच्छा आहे.
संघात युझवेंद्र चहलही या संघात असून हे दोघेही जबरदस्त फिरकीपटू आहेत. झम्पा लीग दरम्यान अंतिम षटकात गोलंदाजी करण्याबद्दल म्हणतो की, भारतीय फिरकी गोलंदाजाच्या डोक्यात काय भूमिका असतात या मला वाचायच्या आहेत.
इंग्लंडविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत शेवटच्या षटकात झाम्पाला साजेशी गोलंदाजी करता आली नाही. यापूर्वी राइझिंग पुणे सुपर जायंट्ससाठी दोन आयपीएल हंगाम खेळलेल्या झाम्पाने सांगितले की, “मला शेवटच्या षटकात गोलंदाजी करायला आवडते. मला विशेषत: अशी आव्हाने आवडतात जिथून सामन्याची भूमिका कोणत्याही बाजूला वळविली जाऊ शकते.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्याचा संदर्भ देताना तो म्हणाला, “शेवटच्या दोन षटकांत त्यांना विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती आणि मी कर्णधार आरोन फिंचला सांगितले की, मी गोलंदाजी करावी. पण ठरल्याप्रमाणे ते यशस्वी झाले नाहीत, परंतु मी माझा विचार बदलणार नाही,” असंही झम्पा म्हणाला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत वेबसाईटवर त्याने सांगितले की, “आयपीएलमध्ये चहलबरोबर आरसीबीकडून गोलंदाजीची मला चांगली संधी मिळेल. आमचा संघ ज्या प्रकारे आहे, त्यामुळे मला शेवटच्या षटकात गोलंदाजीची संधी मिळू शकते.”
झम्पाला अंतिम ११ मध्ये स्थान मिळविणे कठीण होईल, चहलशिवाय संघात फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी आणि इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली आहे.
तो म्हणाला, “मला दुसर्या लेगस्पिनरबरोबर गोलंदाजी करायला आवडते. चहलबरोबर गोलंदाजीची संधी मिळाल्यामुळे आनंद होईल. आम्ही एकमेकांकडून शिकू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी विरुद्ध न खेळणे दिलासा देणारी गोष्ट असेल; पहा कोण म्हणतंय
-माजी दिग्गज म्हणतो, आरसीबीने या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे, तरच….
-पीसीबीने शोएब अख्तरला दाखवला ठेंगा; ‘हा’ माजी खेळाडू राहणार पाकिस्तान संघाचा चीफ सिलेक्टर
ट्रेंडिंग लेख-
-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय
-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!
-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान