‘देविशा शेट्टी’, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाचा अर्थात मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव याची पत्नी. दाक्षिणात्य कुटुंबातील देविशा हिचा जन्म १७ नोव्हेंबर १९९३ ला मुंबई येथे झाला आणि ती मुंबईतच लहानाची मोठी झाली. २०१२ साली मुंबईच्या आर. ए. पोदार कॉलेजमध्ये तिची आणि यादवची पहिली भेट झाली.
त्यावेळी नुकतेच मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलला यादव देविशाच्या डान्सच्या प्रेमात पडला. हळूहळू ते एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. अखेर ७ जुलै २०१६ला यादव आणि देविशाने लग्न केले.
https://www.instagram.com/p/B4G-oQ8AKk8/
देविशा ही २०१३ ते २०१५ मध्ये एनजीओ ‘द लाइटहाऊस प्रोजेक्ट’साठी स्वयंसेवक म्हणून काम करत होती. तिला नृत्याची खूप आवड आहे. म्हणून तिने मुंबईत नृत्य प्रशिक्षक (डान्स टीचर) म्हणून आपल्या नव्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. शिवाय, तिला ट्रॅव्हलिंग आणि स्विमिंग करायलाही खूप आवडते. देविशाने तिच्या मानेवर आपल्या पतीच्या नावाचा अर्थात सूर्या असा टॅट्यू बनवला आहे. Suryakumar Yadav’s Wife Devisha Shetty Started Her Career As Dance Coach
https://www.instagram.com/p/CAFaeAgAGz6/
सूर्यकुमार यादव हा पुढच्या महिन्यापासून युएईत शानदार फलंदाजी प्रदर्शन करताना दिसेल. यादव हा युएईत ५० पेक्षा जास्त फलंदाजी सरासरी असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याची युएईतील फलंदाजी सरासरी ५५ इतकी आहे. शिवाय, यादवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ८५ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ७ अर्धशतकांच्या मदतीने १५४४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन
जाणून घ्या रोहित शर्माची पहिली कमाई किती होती आणि ती कशी खर्च केली ?
…म्हणून सोशल मीडियावर विराट कोहलीची केली जात आहे चेष्ट
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: अफाट लोकप्रियतेचा धनी ठरलेला पण तितकाच वादग्रस्त जेसी रायडर
आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप
चौथ्या क्रमांकानंतर फलंदाजीला येत २५ ओव्हरच्या आत शतक करणारे जगातील २ अवलिया क्रिकेटर