आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स संघाला रोहित शर्माने पाचव्यांदा विजेतेपद पटकावून दिले. त्यामुळे त्याला भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद द्यावी म्हणून जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यातच ऑस्ट्रेलियात सलग दोन वनडे सामन्यात भारतीय संघाला पराभव पहावा लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आले आणि रोहितला कर्णधार करावे आणि विराटला त्या पदावरून पायउतार करावे अशी चर्चा जोर धरत होती. मात्र यावर भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे मत आहे कर्णधार बदलण्याची काही गरज नाही.
लक्ष्मण म्हणाला की, रोहित शर्मामध्ये ती क्षमता आहे की भारतीय संघात सातत्याने जागा बनवू शकतो. रोहितला पाहिल्यावर त्यांना स्वतःची आठवण येते .
रोहितला विराटच्या जागी कर्णधार बनवण्यावर लक्ष्मण म्हणाला, यामध्ये काही शंका नाही की तो एक उत्तम कर्णधार आहे. जेव्हा कधी विराटच्या अनुपस्थित संघाची कमान सांभाळली तेव्हा त्याने यश मिळवले आहे. परंतू फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करताना पाच किताब मिळवून देणे सोपी गोष्ट आहे. ज्याप्रकारे त्याने मुंबई इंडियन्स संघाला कठीण काळात संघाला सावरले हे नक्कीच कमाल आहे. त्याच्यामधे यशस्वी कर्णधार होण्याचे सर्व गुण आहेत. मात्र भारतासाठी जबरदस्ती बदल करण्याची गरज नाही. विराटची कामगिरी चांगली राहिली आहे आणि तो सध्या चांगले काम करत आहे. त्यामुळे मला नाही वाटत बदल करण्याची गरज आहे.
रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील भूमिकेबद्दल बोलताना लक्ष्मण म्हणाला, त्याला पाहिल्यानंतर मला माझी आठवण येते, जेव्हा मला फलंदाजी क्रमांकामध्ये बदल करण्यात सांगितले होते. प्रतिभावान वेगवान गोलंदाजांसमोर डावाची सुरुवात करणे सोपे नसते. जेव्हा तुमच्याकडे पहिला डावाची सुरुवात करण्याचा अनुभव नसतो. एकदा तुमची नजर बसली की नंतर कोणत्याही गोलंदाजांना दबावात टाकू शकता.
महत्त्वाच्या बातम्या –
…. म्हणूनच जसप्रीत बुमराह यशस्वी गोलंदाज, ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने उधळली स्तुतीसुमने
पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, ‘हा’ खेळाडू ठरला सामनावीर
टीम इंडियासाठी आनंदाची गोष्ट; अजिंक्य रहाणेची ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ संघाविरुद्ध शतकी खेळी
ट्रेंडिंग लेख –
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग