भारताविरुद्धच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सोमवारी (१४ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया कसोटी संघात सामील होणार आहे. स्टार्क आपल्या सहकाऱ्यांसोबत ऍडलेडसाठी रवाना होणार आहे. खरं तर स्टार्क आपल्या कौटुंबिक कारणांमुळे भारताविरुद्धची टी२० मालिका मध्येच सोडून घरी परतला होता.
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी म्हटले की, “या कठीण परिस्थितीत आम्ही मिचेलसोबत आहोत. तसेच मला आनंद आहे की, तो त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकला. सोमवारी आम्ही (१४ डिसेंबर) त्याला ताफ्यात सामील करण्यासाठी उत्सुक आहोत.”
स्टार्क जॉश हेजलवूड आणि पॅट कमिन्ससोबत वेळेत गोलंदाजी करण्यास उतरला नाही, तर त्याची जागा घेण्यासाठी जेम्स पॅटिन्सन आणि मायकल नेसर संघात उपस्थित आहेत.
स्टार्कच्या पुनरागमनावर हेजलवूडने म्हटले की, “निश्चितच हे आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टार्क उद्या पुनरागमन करत आहे. तो आमच्या संघाचा आणि गोलंदाजी विभागाचा महत्त्वाचा भाग आहे.”
“सर्वांना माहिती आहे की, गुलाबी चेंडूसोबत त्याचे आकडे किती शानदार आहेत. त्यामुळे आम्ही त्याचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत. जर आम्ही या मालिकेत काही शिकलो आहोत, तर ते कोणतीही गोष्ट योजनेनुसार होत नाही. आम्ही वेळापत्रक आणि प्रवास तसेच बाकी गोष्टींसोबत संघर्ष करत होतो. मला विश्वास आहेा की, स्टार्कसोबत जे काही झाले, ते यापेक्षा वेगळे काही नसेल,” असे स्टार्कबद्दल बोलताना हेजलवूड म्हणाला.
“तो व्यावसायिक खेळाडू आहे आणि तो जे काही करू शकतो, ते तो मागील आठवड्यात करत असेल. आणि निश्चितच तो जेव्हा पुनरागमन करेल, तेव्हा तो खेळण्यासाठी तयार असेल,” असेही तो पुढे म्हणाला.
ऑस्ट्रेलिया कसोटी संघ-
टीम पेन (कर्णधार), सीन ऍबॉट, जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जॉश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅब्यूशाने, नेथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाहेर
…तर ऑस्ट्रेलिया ४-० ने मालिका जिंकेल, माजी दिग्गज कर्णधाराची भविष्यवाणी
‘तुझ्या घरचेही तुझ्याबद्दल…’, ट्रोल करणाऱ्या चाहत्याला ‘गब्बर’चा दणका