क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते हे काही नवीन नाही. अनुष्का-विराट, हार्दिक-नताशा, युवराज-हेजल, हरभजन- गीता ही त्याची काही उदाहरणे आहेत. या क्रिकेटपटूंना आपले प्रेम मिळवण्यात यश आले आणि त्यांनी पुढे जाऊन त्यांनी विवाह देखील केला. परंतु अशाही काही अभिनेत्री आहेत, ज्या क्रिकेटपटूंच्या प्रेमात तर पडल्या पण त्यांना लाइफ पार्टनर बनवू शकल्या नाहीत. चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रींबद्दल अधिक माहिती.
रेखा –
ही गोष्ट १९८० ची आहे, जेव्हा सर्वत्र प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री रेखा आणि पाकिस्तान संघाचे कर्णधार इमरान खान यांच्यातील प्रेमाच्या चर्चा सुरू होत्या. रेखाच्या आईला देखील असे वाटू लागले होते की, इमरान खान रेखासाठी योग्य मुलगा आहे. परंतु त्यानंतर असे काहीतरी घडले, ज्यानंतर या सर्व गोष्टींवर पूर्णाविराम लागला. त्यावेळी एका मुलाखतीत इमरान खानने म्हटले होते की, “मी रेखासोबत एक अविस्मरणीय वेळ घालवला, पण आता मला या नात्यातून बाहेर यायचे आहे. मला अभिनेत्रीसोबत विवाह करायचा नाहीये.” परंतु रेखाने या नात्यावर कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
हेमा मालिनी –
बॉलिवूडमध्ये १९८० चे दशक हेमा मालिनीने आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर गाजवले होते. त्यावेळी ती सर्वांना हवी हवीशी वाटायची. इतकेच नव्हे तर भारतीय क्रिकेटपटू एस. वेंकटराघवन यांना देखील हेमा मालिनी आवडायची. त्यांनी सार्वजनिकरित्या आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली होती. परंतु हेमा मालिनीने नकार कळवला होता. यामागील प्रमुख कारण म्हणजे हेमा मालिनीला धर्मेंद्र खूप आवडायचे. दोघेही १९८० विवाहबंधनात अडकले होते.
नीना गुप्ता –
नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्या देखील प्रेमाच्या चर्चांना उधाण आले होते. इतकेच नव्हे तर दोघेही एका मुलीचे आई वडील देखील झाले होते. परंतु हे दोघेही कधीच एकत्र येऊ शकले नाहीत. त्यांच्या मुलीचे नाव मसाबा असे आहे. नीनाने पुढे जाऊन चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरासोबत विवाह केला होता.
दीपिका पदुकोण –
दीपिका पदुकोणचे नाव अनेकांसोबत जोडले गेले होते. त्यापैकीच एक म्हणजे विस्फोटक फलंदाज युवराज सिंग. अशा बातम्यांना उधाण आले होते की, किम शर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर युवराज सिंग आणि दीपिका पदुकोण एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दीपिका पदुकोणचे नाव एमएस धोनीसोबत देखील जोडले गेले होते. शेवटी युवराज सिंगने हेजल कीचसोबत विवाह केला तर, दीपिका पदुकोण रणवीर सिंगसोबत विवाहबंधनात अडकली आहे.
किम शर्मा –
सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. असेही म्हटले गेले होते की, किम शर्मा आणि युवराज सिंग या दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होते. परंतु दोघांनी या गोष्टीची कबुली दिली नव्हती. त्यावेळी अशा देखील चर्चा रंगल्या होत्या की, हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. परंतु या सर्व गोष्टींवर पूर्णविराम लागला जेव्हा, युवराज सिंगने हेजल कीच सोबत विवाह केला.
महत्वाच्या बातम्या-
‘टी२० विश्वचषकातील सामन्यापूर्वीच पाकिस्तानला घाबरलेले भारतीय खेळाडू’, माजी क्रिकेटर बरळला