क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक कठोर नियम तयार केले गेले आहेत. वेगवान चेंडूमुळे होणाऱ्या दुखापती टाळण्यासाठी प्रत्येक फलंदाजाने हेल्मेट घालणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने सक्तीचे केले आहे. सन २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्यूज याच्या दुर्देवी निधनानंतर या सर्व गोष्टींची कठोरतेने अंमलबजावणी केली जाते. मात्र, काल (१४ नोव्हेंबर) पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएलमधील सामन्यादरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा एक विचित्र प्रकारचे हेल्मेट घालून फलंदाजी करताना दिसला. ते हेल्मेट अत्यंत धोकादायक व आयसीसीच्या नियमांना बगल देऊन बनवले गेले होते.
कोणत्याही स्तरावरील क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या सुरक्षिततेसाठी तोंडावर लोखंडी जाळी असलेले हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. शनिवारी (१४ नोव्हेंबर) झालेल्या पीएसएल सामन्यात शाहिद आफ्रिदी वेगळ्या पद्धतीचे हेल्मेट घालून आला. ते हेल्मेट समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले. कराची किंग्ज विरुद्ध मुलतान सुलतान यांच्यात झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात तो ज्या प्रकारचे हेल्मेट घालून फलंदाजीसाठी उतरला, ते अत्यंत धोकादायक होता. सुरक्षेच्या बाबतीत, आयसीसीने आखून दिलेल्या नियमांना धरून ते हेल्मेट नव्हते. वेगवान बाऊंसर चेंडू टाकण्यात आला असता, तर आफ्रिदीचे आयुष्यही धोक्यात येऊ शकले असते. या हेल्मेटच्या समोरील बाजूस चेहरा संरक्षणासाठी हवे असलेले ग्रील नव्हते. आफ्रिदीचा चेहरा जवळजवळ उघडा होता.
@GautamGambhir what do you think of Shahid Afridi's Helmet? 🤣😂#PSL2020 pic.twitter.com/Ao3DA5m0hL
— Yash Shah (@imyashah) November 15, 2020
Is it me or is Afridi's helmet grill really dangerous?
Seems to be very open around the eyes and mouth area 🤨#PSL #MSvKK
— Tanzil Khawaja (@TanzilKhawaja) November 14, 2020
Shahid Afridi solving the problem/ destroying the point of your modern fixed-grille helmets. pic.twitter.com/kXpaeVgdCG
— Dave Tickner (@tickerscricket) November 14, 2020
आफ्रिदीने या सामन्यात १२ चेंडूत १२ धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या खेळीपेक्षा त्याच्या हेल्मेटचीच अधिक चर्चा झाली. समालोचन करणारे बाझिल खान म्हणाले, “शाहिद अत्यंत मजेशीर हेल्मेट घालून आलाय. याच्यातर हेल्मेट ग्रीलच नाही. मी यापूर्वी असे हेल्मेट कधीही पाहिले नाही.”
दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू जॉन्टी रोड्स या अजब हेल्मेटवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “मी काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे हेल्मेट घालून खेळण्याचा प्रयत्न केला होता. ग्रीलमुळे मला चेंडू पाहण्यात अडचण येत होती. याच कारणाने मी ग्रील नसलेले हेल्मेट घातलेले. कदाचित, चेंडू व्यवस्थित दिसावा म्हणूनच त्याने हे ग्रील हटवले आहे.”
कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलल्या गेलेल्या पीएसएल प्ले-ऑफ्सना काल सुरुवात झाली. क्वालिफायर १ मधील कराची किंग्ज विरुद्ध मुलतान सुलतान हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. ज्यात, कराची किंग्जने विजय मिळवत; अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली. पराभूत मुलतान सुलतान आज क्वालिफायर २ मध्ये एलिमिनेटर विजेत्या लाहोर कलंदर्सविरूद्ध भिडेल.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची झाली कोरोना टेस्ट; पाहा काय आलेत खेळाडूंचे रिपोर्ट
आयपीएल जिंकल्यानंतर रोहित शर्मा बनला ‘या’ कंपनीचा ब्रॅंड एंबेसेडर; देणार शैक्षणिक क्षेत्रात योगदान
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर