भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. ३७ वर्षीय स्टुअर्ट बिन्नीने साल २०१४ मध्ये भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ६ कसोटी, १४ एकदिवसीय आणि ३ टी२० सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो आता कोणते क्षेत्र निवडेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
बिन्नीने त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीतील सर्वाधिक सामने त्याचा संघ कर्नाटकसाठीच खेळले आहेत. असे असले तरीही, नंतर त्याने शेवटचे दोन हंगाम नागालँडसाठी खेळले. तो बंद झालेल्या भारतीय क्रिकेट लीगचाही भाग राहिला आहे. बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघाच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार राहिला आहे. २०१३-२०१४ मध्ये कर्नाटकच्या संघाला रणजी स्पर्धेचा विजेता संघ बनवण्यात बिन्नीचे मोठे योगदान राहिले आहे. त्याने या काळात संघासाठी ४४३ धावा केल्या असून १४ विकेट्सही घेतल्या होत्या.
१९८३ च्या विश्वचषकाचा नायक रोजर बिन्नी यांचा स्टुअर्ट बिन्नी हा मुलगा आहे. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो खेळाडूंना प्रशिक्षण देऊ इच्छित आहे.
त्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “मी खेळाडूंचा प्रशिक्षण द्यायला आधीच सुरुवात केली आहे आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये लेवल २ ची ट्रेनिंगही पूर्ण केली आहे. मी युवा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलूंना प्रशिक्षण देण्यासाठी विचार करत आहे. प्रशिक्षणासाठी देशाचा एक खास कोपरा माझ्या नजरेत आहे.”
“क्रिकेटच्या सिस्टमला समजण्यासाठी मी ईशान्येकडील भागात (नाॅर्थ ईस्ट) दोन वर्षे घालवली आहेत. तेथे खूप प्रतिभाशाली खेळाडू आहेत. मात्र क्रिकेटला म्हणावा तितका वाव नाही. म्हणून माझे मुख्य लक्ष्य त्या क्षेत्रात क्रिकेटला माघारी आणणे असेल. कारण तेथील खेळाडू माझ्यासोबत काम करू इच्छित आहेत. क्रिकेट खेळण्यामध्ये त्यांची मदत करण्यासाठी मी निश्चित रूपात माघारी जाणार आहे,” असेही त्याने शेवटी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
नादच खुळा! दोन नव्या संघांच्या लिलावातून बीसीसीआयला मिळणार ‘एवढे’ रुपये
बटलर-स्टोक्सच्या जागी राजस्थान रॉयल्समध्ये २ नव्या खेळाडूंची एन्ट्री; एकाने ठोकलेत ३३७ षटकार
टीम इंडियावर कसोटी मालिका पराभवाचे सावट! ओव्हल अन् मँचेस्टरवरील आकडे आहेत खूपच दुर्देवी