मुंबई । आयपीएल 2020साठी सर्व संघ आणि बीसीसीआयचे अधिकारी युएईला पोहोचले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता बीसीसीआयच्या अधिकार्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तयारीवर नजर ठेवण्यासाठी आलेल्या, भारतीय क्रिकेट बोर्डाचा (बीसीसीआय) सदस्य कोविड -19 टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे.
आयपीएलच्या एका वरिष्ठ अधिका-याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “बीसीसीआयच्या एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती कोण आहे हे मी सांगू शकत नाही. इतर सर्वांच्या कोरोना टेस्ट झाल्या असून सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. कोणालाही या आजाराची लक्षणे नाहीत.”
यापूर्वी, गेल्या आठवड्यात चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडूंसह 13 सदस्यांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली होती. पण आता त्यांची सोमवारी केलेली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पण तरीही ते सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. त्यामुळे संघाचे सराव सत्रही तहकूब करावे लागले.
दुबईमध्ये पोहचल्यानंतर खेळाडूं सहा दिवस क्वारंटाइनमध्ये होते. त्यानंतर त्यांचा कोरोना टेस्ट करण्यात आला. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली. कोविड -19 मुळे यावेळी आयपीएलचे आयोजन यूएईच्या तीन शहरात म्हणजे दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे 19 सप्टेंबरपासून होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या जोफ्रा आर्चरने आपल्या मैत्रिणीसाठी तोडला होता ‘हा’ मोठा नियम
हवेत सूर मारून ४८ वर्षीय प्रवीण तांबेने घेतला अविश्वसनीय झेल; पहा व्हिडिओ
दोन महिन्यांनी दौऱ्यावरुन परत आलेल्या क्रिकेटर बापाला ओळखेना चिमुकला
ट्रेंडिंग लेख –
भारताचे २ दिग्गज फलंदाज, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ठोकले वेगवान शतक
आयपीएलचे सितारे: कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा यांना टक्कर देणारा २० वर्षीय अभिषेक शर्मा
वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर