मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी हा दौरा पुढे ढकलण्याविषयी माहिती दिली. सीपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही आयपीएलमध्ये व्यस्त असतील. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका त्याच्यासाठी कठीण होती.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संचालक, ग्रॅमी स्मिथ म्हणाले की, “हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडीज दौरा पुढे ढकलला जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती.”
ते म्हणाले की, “खेळाडू खूप व्यस्त असणार आहेत. त्यामुळे कसोटी आणि टी20 मालिकेचा वेस्ट इंडिजचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत हा दौरा होणार होता, परंतु कोरोनामुळे तो नोव्हेंबरमध्ये व्हावा अशी चर्चा सुरू होती. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा संघही श्रीलंकेविरुद्ध खेळणार होता पण ती मालिका देखील पुढे ढकलली गेली.
ते म्हणाले, “दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलमध्ये सहभागी होतील. त्यापूर्वी ते वेस्ट इंडीज टी -20 लीग सीपीएलमध्येही खेळणार आहेत. या सर्व व्यस्त वेळापत्रकांकडे पाहता वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळणे अशक्य वाटले.”
दक्षिण आफ्रिकेचा संघ अखेर वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. यावेळी धर्मशाला येथे झालेल्या पहिल्या वनडेत पाऊस पडला. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हा दौरा सोडून पुन्हा दक्षिण आफ्रिकेला परतला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तथापि, त्यांनी स्थानिक पातळीवर तीन संघांमध्ये एक चॅरीटी सामना खेळला होता. तसेच त्यांच्या देशातही हळू हळू क्रिकेट मैदानात परतत आहे.
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजचा दौरा रद्द केल्याने वेस्टइंडीज पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर कर्णधार जेसन होल्डरने त्याचे क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात सापडल्याची माहिती दिली होती. ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी त्यांनी इंग्लंड आणि भारतीय संघाला वेस्ट इंडीजचा दौरा करावा अशी विनंती केली होती. यासोबतच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सर्व खेळाडूंच्या पगारात कपात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना व्हायरस असूनही आयपीएल २०२० होणार सुपर-डूपर हिट; जाणून घ्या कारण…
‘भारताला विश्वचषक जिंकून देऊनच निवृत्त होणार’, पहा कोण म्हणतंय
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रशिक्षण होणार या देशात?
ट्रेंडिंग लेख –
लग्न न करताच वडील होणारे हे आहेत ४ क्रिकेटपटू
आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम
संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज, ज्यांनी शेवटच्या षटकात दिल्या ६ पेक्षाही कमी धावा